स्वित्झर्लंण्डमधील जिनेव्हा या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरात बियरचा दर हा जगात सर्वात महाग असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. येथील बियरचा दर सर्वसाधारणपणे ३३० एमएल बियरच्या एका बाटलीसाठी ६.३२ डॉलर इतका आहे. ‘गोयुरो’ या ट्रॅव्हल विषयीच्या संकेतस्थळाने ही पाहणी केली असून, दुसऱ्या स्थानावर असलेल्या हाँगकाँग येथे ३३० एमएल बियरच्या बाटलीची किंमत ६.१६ डॉलर, तर तिसऱ्या स्थानावरील तेल अविव येथे ही किंमत ५.७९ डॉलर इतकी आहे. त्यापाठोपाठ ओस्लो येथे ही किंमत ५.३१ डॉलर, तर न्यूयॉर्क येथे ५.२० डॉलर इतकी आहे. परंतु, स्वित्झर्लंण्डमधील सर्वात मोठ्या आणि महागाईबाबत जगात ११ व्या स्थानावर असलेल्या झुरीच या शहरात मात्र बियरची किंमत कमी असून, सर्वसाधारणपणे एका बियर बाटलीची किंमत ४.६० डॉलर इतकी असल्याचे ‘गोयुरो’च्या २०१५ साठीच्या बियर विषयीच्या कोष्टकात म्हटले आहे. तर, पोलंडमधील क्राको शहरात आणि युक्रेनची राजधानी किव्ह येथे बियरच्या बाटलीची किंमत सर्वसाधारणपणे १.६६ डॉलर इतकी स्वस्त असल्याचे ऐकून बियर प्रेमी नक्कीच खूष होतील. बियर किंमतीच्या या पाहणीत ७५ शहरांमधील सुपरमार्केट आणि बारमधील ३३० एमएल बियरची सर्वसाधारण किंमत प्राप्त करून बियरच्या एकंदर सर्वसाधारण किंमतीवर निश्चिती करण्यात आली. ‘गोयुरोने’ यासाठी जगभरातील अनेक ब्रॅण्ड आणि प्रत्येक शहरातील मुख्य स्थानिक ब्रॅण्डचा यात समावेश करून बियरच्या दराचे अमेरिकन डॉलरमध्ये परिवर्तन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा