सध्या भारतात आयफोनची चालती पहायला मिळते. त्यातच अॅपल कंपनीने गेल्याच वर्षी तीन नवे आयफोन iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR बाजारात लॉन्च केले. आता अॅपल कंपनीने ग्राहकांसाठी या तिघांमधील स्वस्त असणाऱ्या आयफोन एक्स आरवर काही खास सवलती देण्याचा ठरवले आहे. आयफोन एक्सआरची किंमत ७६,९०० रुपये असून कंपनीने दिलेल्या सवलतीनंतर त्याची किंमत ५९,९०० रुपये होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यतिरिक्त HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे फोनवर आणखी सवलत मिळाणार आहे. हे कार्ड वापरुन फोनची खरेदी केल्यास आणखी १० टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. या कॅशबॅकनंतर आयफोन एक्सआरची किंमत ५३,९०० रुपये आहे. हा सेल ५ एप्रिल रोजी सुरू होणार असून काही वेळापुरता मर्यादित असणार आहे.

आयफोन एक्सआरमध्ये ६.१ इंची डिस्प्ले, १२९२ X ८२८ रेजॉलूशन, ए१२ बायॉनिक प्रोसेसर, फेसआइडी, टच टू वेकअप, ड्यूल सिम, १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असे फीचर देण्यात आले आहेत. त्याच बरोबर ६४ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple announces biggest discount on iphone xr