सर्वात महागडा फोन म्हणून आयफोनची ख्याती आहे. हा फोन वापरणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. मात्र या फोनमध्ये बिघाड झाल्यास अनेकांना दुरुस्तीसाठी अधिकृत सेंटरमध्ये धाव घ्यावी लागते. कधी कधी काही दुरुस्तीसाठी लोकल मार्केटमध्ये दिला जातो. त्यामुळे अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. आता अॅपलने प्रथमच स्वत: ची दुरुस्ती योजना सुरू केली आहे. सेल्फ-रिपेअर प्रोग्राम अंतर्गत तुम्ही आता मूळ अॅपलचे स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकाल आणि तुमचा iPhone किंवा MacBook स्वतःच दुरुस्त करू शकाल. अॅपलने पहिल्यांदाच सामान्यांसाठी स्पेअर्स उपलब्ध करून दिले आहेत. २०१९ मध्ये, Apple ने प्रथमच असा कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर मोबाईल दुरुस्तीची दुकाने अॅपलच्या उत्पादनांचे सुटे भाग खरेदी करू शकतात. या कार्यक्रमांतर्गत २,८०० मोबाइल दुरुस्तीची दुकाने जोडली गेली आहेत, तर ५,००० अधिकृत दुरुस्ती केंद्रे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा