Apple कंपनीच्या लेटेस्ट 7th जनरेशन आयपॅड 2019 ची (iPad 2019) भारतात चार ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. हा नवा आयपॅड कंपनीने 10 सप्टेंबर रोजी आयफोन 11 मालिकेसह लाँच केला होता. नवा आयपॅड सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड कलर अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. स्टोरेजसाठी 32GB आणि 128GB असे दोन पर्याय यामध्ये आहेत. ‘वाय-फाय ऑन्ली’ आणि ‘सेल्युलर’ अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा आयपॅड उपलब्ध असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स – नव्या 7th जनरेशन आयपॅडमध्ये कंपनीने मोठी स्क्रीन दिली आहे. पूर्वीचा आयपॅड 9.7 इंच डिस्प्लेचा होता. तर, नव्या आयपॅडमध्ये आता 10.2 इंचाचा डिस्प्ले मिळेल. यामध्ये कंपनीने A10 बायॉनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. तसंच, नव्या आयपॅडमध्ये स्मार्ट कनेक्टर हे फीचर देखील आहे. एचडी प्रतिमांसाठी यामध्ये मागील बाजूला 8MP कॅमेरा आहे, तर फेसटाइमसाठी पुढील बाजूला 1.2MP कॅमेरा आहे. याची बॅटरी 10 तासांचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. हा बॅकअप वेब सर्फिंग, व्हिडिओ पाहताना आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग पाहतानाही मिळेल असं कंपनीने नमूद केलंय.

किंमत –
भारतात 7TH जनरेशन आयपॅडच्या वाय-फाय ऑन्ली या व्हेरिअंटची किंमत 29 हजार 990 रुपये आहे. तर, सेल्युलर मॉडलची किंमत 40 हजार 900 रुपये आहे. याशिवाय अ‍ॅपल पेंसिल तुम्ही 8 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. यासोबत अ‍ॅपल टीव्हीचं सब्स्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत मिळेल.