हल्ली प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे बनले आहे. प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते. प्रत्येकालाच आपल्याची तब्येतीची काळजी असते. तसेच आपला चेहरा चांगला दिसावा याची काळजी देखील असते. अनेक महिला सकाळी आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. मात्र रात्री आपल्या चेहऱ्याकडे त्या लक्ष देत नाहीत किंवा कामाच्या घाईगडबडीत त्यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेस आणि डलनेस दिसून येतो. अशा वेळी रात्रीच्या वेळी आपल्या त्वचेची खास करून चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आपला चेहरा स्वच्छ राहण्यासाठी दिवसातून काही वेळा तो तो पाण्याचे स्वच्छ धुवावा. म्हणजे त्यावरील धूळ,किंवा काही घटक असलीस ते निघून जाण्यास मदत होते. तसेच रात्री चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर नाइट क्रीम लावून झोपतात.मात्र जर का तुमच्याकडे नाइट क्रीम नसेल तर काळजी करण्याची गरज नाही आहे. आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्याचा वापर करून देखील चेहरा चांगला ठेवता येऊ शकतो.
दूध आणि केशर
दूध आणि केशर हे दोन्ही पदार्थ चेहऱ्यासाठी चांगले आहेत. दूध आणि केशर यांचे मिश्रण एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील टॅनिंगच्या समस्या पण दूर होतात. तळहातावर थोडेसे दूध घेऊन त्यात एक ते दोन केशराच्या साली मिसळा. दुधाचा रंग लगेच बदलतो. ते चेहऱ्यावर लावावे आणि झोपी जावे. तुम्हाला वाटल्यास थोड्या वेळाने तुम्ही ते पाण्याने धुवून देखील झोपू शकता. दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर सोनेरी चमक दिसू लागेल.
काकडीचा रस
काकडीचा रस देखील चेहऱ्यासाठी चांगला असतो. काकडीच्या रस चेहऱ्याला लावल्याने चेहरा ताजातवाना होतो. त्वचेला ओलावा देतो. त्वचेवरील गोठलेल्या मृत पेशी काढून टाकतो. काकडीच्या रसामध्ये पुदिन्याचा रस मिसळून तो चेहऱ्याला लावल्यास उपयुक्त उतरू शकतो. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येत नाहीत.
बदामाचे तेल
रात्री चेहऱ्याला तुम्ही बदामाचे तेल देखील लावून झोपू शकता. हे तेल खास करून कोरड्या त्वचेवर फायदेशीर ठरते. बदामाचे तेल त्वचेला व्हिटॅमिन ई चे गुणधर्म प्रदान करते आणि ते त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. बदामाचे तेल चेहऱ्याला लावल्याने त्वचा चांगली होते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. योग्य उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.)