Beauty tips सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या गुलाबी थंडीत आपले गालही गुलाबी दिसावेत असे कोणाला वाटत नाही. परंतु कधीकधी केमिकलवर आधारित मेकअप लावावासा वाटत नाही. प्रत्येकालाच आकर्षक आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या मेकअप प्रोडक्टमध्ये ब्लशर लावल्यावर त्वचेवर एक थर दिसू लागतो, ज्यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक लूक जातो. हे ब्लशर त्वचेला ग्लो देतात, परंतु ते लावल्यानंतर, खूप मेकअप केल्यासारखा चेहरा दिसू लागतो. .
पण चेहऱ्यावर हाच नॅचरल ग्लो आणण्यासाठी भरपूर महागड्या ब्युटी प्रोडक्टची मदत घ्यावी लागते, असा अनेकांचा समज असतो. तर असे मुळीच नाही. सुंदर व निरोगी त्वचा मिळवण्यासाठी बाजारातील ब्लशरऐवजी घरी बनवलेले नैसर्गिक ब्लशर वापरा. हे हलके रंगाचे असतात आणि त्वचेला हानीही पोहोचवत नाहीत. चला जाणून घेऊया नैसर्गिक ब्लशर बनवण्यासाठी कोणती फळे वापरता येतात.
बीटरूट ब्लश
बीटरूट ब्लश वापरू शकता. ही एक नैसर्गिक पद्धत आहे ज्याचे गालांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जुन्या काळी स्त्रिया शृंगार करत नसत, त्या नैसर्गिक पद्धतीने त्यांचे सौंदर्य वाढवत असत. तेव्हा गालांना लाल रंग देण्यासाठी ते बीटरूटचा वापर करायचे. चला तर मग बीटापासून ब्लशर कसा बनवायचा ते येथे जाणून घेऊया.
- सर्वप्रथम बीटरूट नीट धुवून सोलून घ्या.
- किसून त्याचे पातळ तुकडे करून उन्हात वाळवा.
- बीटरूट मिक्सर जारमध्ये बारीक करा म्हणजे बारीक पेस्ट तयार होईल.
- आता त्यात थोडे ग्लिसरीन टाका आणि चांगले मिसळा.
- तुमचा नैसर्गिक ब्लशर तयार आहे, जो तुम्ही एका लहान कंटेनरमध्ये ठेवू शकता.
- अशा प्रकारे घरी बनवलेला ब्लश १००% नैसर्गिक आणि केमिकलमुक्त आहे आणि खूप प्रभावी देखील आहे.
- बीटरूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला फायदेशीर ठरतात.
- याशिवाय बीटरूटपासून बनवलेला ब्लशर जास्त काळ चिकट राहत नाही.
गाजर ब्लश
तुम्हालाही जर गाजरासारख्या रंगाचा ब्लश हवा असेल तर अहो गजरापासूनच घरच्या घरी तयार करा हा ब्लशर .गाजरापासून बनवलेले होममेड नैसर्गिक ब्लशर तुमच्यासाठी फायदेशीरही आहे. हा बनवायलाही खूप सोपा आहे. हा १००% नैसर्गिक आणि केमिकल-मुक्त ब्लशर तुमच्या गालांना नैसर्गिक चमक देईल.
हेही वाचा >> पायाच्या तळव्यांना खाज सुटतेय किंवा आग होतेय? आराम मिळण्यासाठी हे सोपे उपाय वापरून पाहा
- सर्व प्रथम, केशरी रंगाचे गाजर घ्या आणि ते चांगले धुवा.
- आता गाजर किसून घ्या, त्यांचे पातळ तुकडे करा आणि उन्हात वाळवा.
- वाळवलेले गजार मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक करा.
- तुमचा घरगुती नैसर्गिक गाजर ब्लश तयार आहे, जो तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता.