मेकअप करणं प्रत्येक महिलेला आवडतं. मेकअप केल्याने महिलांच्या सौंदर्यात आणखीनच वाढ होते. काजळ लावणे हा मेकअपमधील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. यामुळे आपले डोळे फारच सुंदर आणि आकर्षक दिसतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की दररोज काजळ लावणे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या डोळ्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिसळलेले असतात. जर या केमिकलची मात्र अधिक असेल तर यामुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जी आणि डोळे कोरडे होण्याची शक्यता असते.

पाणीपुरी खाऊन कमी करता येणार वजन? समोर आली आश्चर्यकारक माहिती

काजळमुळे होणारे नुकसान

काजलमध्ये पारा शिसे आणि पॅराबेन्ससारखे घटक वापरले जातात. यामुळे डोळे येण्याची समस्या जाणवू शकते. रोज काजळ लावल्याने डोळ्यांची अ‍ॅलर्जी, कॉर्नियल, तसेच डोळ्यांच्या आत सूज येण्याचाही धोका असतो.

घरच्या घरी बनवा काजळ

काजळ बनवण्यासाठी सर्वात आधी दिवा लावून त्याबाजूला दोन वाट्या ठेवा. एका ताटाला तूप लावून वाटीवर ठेवा. यानंतर, २० ते ३० मिनिटांनी ताटावर काजळी जमा होईल. ही काजळी तुम्ही एखाद्या भांड्यात जमा करून ठेवू शकता. त्यात खोबरेल तेलाचा एक थेंब घाला आणि चांगले मिसळा. अशा प्रकारे तुमचे घरगुती काजळ तयार होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applying kajal daily can be dangerous may cause major damage to eyes pvp