जर एखादी स्त्री गर्भधारणेचा प्रयत्न करत असेल आणि त्यानंतर त्या स्त्रीला गर्भधारणेशी संबंधित लक्षणे देखील जाणवत असतील, तर तिला त्याचा खूप आनंद होतो. परंतु अनेक वेळा गरोदरपणाची लक्षणे दिसू लागल्यानंतरही गर्भधारणेचा अहवाल निगेटिव्ह येतो. अशा स्थितीत स्त्री नैराश्यग्रस्त होते. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार गर्भधारणेची लक्षणे पाहिल्यानंतरही जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यामागे अनेक कारणे जबाबदार असू शकतात.
गर्भधारणा चाचणी लवकर घ्या
तुम्ही गरोदर असताना, तुमच्या शरीरात एचसीजी नावाचे संप्रेरक तयार होऊ लागते. या संप्रेरकला ओळखल्यानंतर गर्भधारनेची चाचणी सकारात्मक येते. जेव्हा गर्भधारणेला थोडा वेळ होऊन जातो तेव्हाच हा हार्मोन तयार होतो. त्यामुळे जर गर्भधारणा चाचणी खूप लवकर केली गेली तर ती नकारात्मक चाचणी येऊ शकते.
( हे ही वाचा: मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा; नक्कीच आराम मिळेल)
नमुना डाइल्यूट होणे
गर्भधारणा चाचणी सकाळी पहिल्या लघवीसह करावी. कारण असे केल्याने एचसीजी पकडला जातो. सकाळी उठून भरपूर पाणी प्यायल्यास किंवा रात्रभर पाणी पिऊन राहिल्यास लघवीत पाणी मिसळल्याने योग्य परिणाम न मिळण्यासारखी परिस्थिती दिसून येते. गर्भधारणा चाचणी करताना शरीरातील एचसीजीची पातळी खूप कमी असली तरीही काही वेळा योग्य परिणाम दिसून येत नाही. जर तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी तपासले तर हा हार्मोन पकडणे कठीण आहे. हा हार्मोन शरीरात फक्त सकाळीच जास्त प्रमाणात आढळतो.
चाचणीसाठी खूप वेळ घालवणे
ज्याप्रमाणे गर्भधारणा चाचणी खूप लवकर केल्याने चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे, खूप उशीरा चाचणी केल्याने देखील चुकीचे परिणाम येऊ शकतात. हे अशामुळे घडते कारण यावेळी शरीरात एचसीजीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.
( हे ही वाचा: मासिक पाळीच्या रक्ताचा रंग दर्शवतो तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या कधी आहे शरीराला मदतीची गरज)
चाचणी किट खराब होणे
तुम्ही चाचणी नीट केली नाही तरीही चाचणीच्या निकालात बदल दिसून येतात. बहुतेक चाचणी कीट योग्य परिणाम देतात, परंतु जर चाचणी कीट देखील चुकत असेल तर समजून घ्या की आपल्या निकालात चूक आढळू शकते. तर त्यासाठी एक्सपायरी डेटही तपासा आणि त्यापूर्वी किट देखील तपासा. जर तुम्ही चाचणी योग्य रीतीने आणि योग्य वेळी केली तर त्याचे परिणाम योग्य दिसतील. परंतु जर तुम्ही चाचणी बरोबर केली आणि तरीही तुम्हाला असे वाटत असेल की त्याचे परिणाम बरोबर येणार नाहीत, तर तुम्ही एकतर काही काळानंतर दुसरी चाचणी करून घ्यावी.