आले ही एक औषधी वनस्पती आहे त्यामुळे अनेक लोक आल्याचा चहा करू पितात तर काही लोक आले पाक करून खातात. काही लोक आल्याचे लोणचे किंवा मुरांबा देखील खातात. कित्येक आजारांवर आराम मिळण्यासाठी आले वापरले जाते. आपल्याकडे स्वयंपाकामध्ये आल्याचा नेहमी वापर केला जातो.
आले अत्यंत उपयूक्त आहे पण आले वापरताना व्यवस्थित साफ करून घ्यावे लागते. कारण जमिनीखाली उगवणाऱ्या आल्याचा आकार वाकडा तिकडा कसाही असतो त्यामुळे त्यात पाणी जाऊन बसते. वापरापू्र्वी आले काही वेळ पाण्यात भिजवण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतर ते व्यवस्थित धूवून मगच वापरावे लागते. आल्याची साल काढून आले वापरावे लागते पण सर्वात किचकट गोष्ट आल्याची साल काढणे हीच आहे. कारण चाकूने किंवा साल काढणीने आल्याचे साल काढायला गेले तर सालीसह आल्याचा काही भागही निघून येतो ज्यामुळे आल्याची उगाच नासाडी होते. तसेच वाकड्या तिकड्या आल्याच्या कोपऱ्यांमधील साल काढणे देखील कठिण जाते. पण काळजी करू नका. आल्याची साल काढण्याचा अत्यंत सोपा उपाय आमच्याकडे आहे. आल्याची साल काढण्याची भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी वापरल्यानंतर तुम्ही झटपट आल्याची साल काढू शकता.
युट्युबवर Ray Kitchen नावाच्या चॅनेलवर आल्याची साल काढण्याची ट्रिक सांगितली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, चाकूने किंवा साल काढणीने आल्याची साल काढल्यावर कशाप्रकारे आल्याचा गाभा देखील निघतो. म्हणूनच चाकू किंवा साल काढणी ऐवजी तुम्हाला चमचा वापरण्याचा पर्याय सुचवला आहे. चमचा वापरून आल्याची साल झटपट काढता येते आणि आल्याचा गाभा देखील वाया जात नाही. आल्यावर चमचा हळूवार पणे घासा. सर्वबाजूने आल्याची साल काढता येते. वाकड्या आल्याच्या कोपऱ्यांमध्येही चमच्याने सहज साल काढता येते.
ही ट्रिक उपयूक्त आहे की नाही ते तुम्ही स्वत: वापरून पाहा आणि मग ठरवा.