उन्हाळा सुरु झाला आहे आणि कडक उन्हाची झळ आपल्या सर्वांनाच बसू लागली आहे. या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरत आहोत. यामध्ये स्कार्फ, टोपी, पाण्याची बॉटल, छत्री आणि गॉगल्स या वस्तूंचा समावेश आहे. गॉगल ही एक अशी गोष्ट आहे की जी वापरल्याने आपण सुंदरही दिसतो. चांगले गॉगल्स फारच महाग असतात. म्हणून अनेकदा लोकं स्वस्तातले गॉगल्स घेणे पसंत करतात. परंतु असे करणे आपल्या डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते.
बाजारात अनेक स्वस्तातले गॉगल्स मिळतात. हे गॉगल्स जरी आपल्या खिश्याला परवडण्यासारखे आणि फॅशनेबल असले तरीही ते आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने मात्र खूपच हानिकारक असतात. गॉगल्सचा मुख्य हेतू हा यूव्ही रे पासून डोळ्यांचे रक्षण करणे हा आहे. परंतु स्वस्तातील गॉगल्स हा उद्देश पूर्ण तर करत नाहीच. उलट यामुळे आपल्या डोळ्यांना हानी होण्याच्या शक्यता अधिक असतात.
पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
चांगल्या गुणवत्तेचे गॉगल्स डोळ्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच बनवले जातात. तसेच, नंबरचे ग्लासेस आणि गॉगल्स यांचे मिश्रण करूनही चष्मे तयार केले जातात. नेत्र तज्ञांच्या मते, अनेकदा लोकं रस्त्यावरील स्वस्त गॉगल्स विकत घेतात. परंतु असे गॉगल्स डोळ्यांना अपायकारक असतात. या गॉगल्समध्ये वापरली जाणारी काच आणि फायबर तांत्रिकदृष्टया योग्य नसतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांवर ताण पडणे, डोकेदुखी तसेच मोतीबिंदू यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे स्वस्तातील गॉगल खरेदी न करता चांगल्या गुणवत्तेचे आणि डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बनवलेले गॉगल वापरण्याचा सल्ला नेत्र तज्ञ देतात.