पूर्वी लग्नानंतरच पैंजण घालण्याची प्रथा होती. परंतु आजकाल फॅशन म्हणून मुली लग्नाआधीच पैंजण घालायला सुरुवात करतात. खरंतर, भारतीय संस्कृतीमध्ये पैंजण घालणे महत्त्वाचे आहे. हिंदू स्त्रिया लग्नानंतर अनेक श्रुंगार करतात, त्यामागे धार्मिक महत्त्वासोबतच वैज्ञानिक कारणही असते. असे मानले जाते की लग्नानंतर पैंजण घालणे हे स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे, परंतु त्यामागील वैज्ञानिक कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जाते की पैंजण सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक आहे. परंतु हे घालण्याचे वैज्ञानिक कारण आश्चर्यजनक आहे. खरंतर पायात पैंजण घातल्याने हाडे मजबूत होतात. जरी असे मानले जाते की लग्नांनंतरच मुलींनी पैंजण घालावेत, परंतु लग्न न झालेल्या मुलीही पैंजण घालू शकतात. याचे अनेक फायदे आहेत.

मासिक पाळीमध्ये पेनकिलरचे सेवन ठरू शते धोकादायक; ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम

खरंतर, अशी मान्यता आहे की जेव्हा पैंजण पायाला घासले जातात तेव्हा त्वचेच्या माध्यमातून यातील तत्त्व हाडांना मजबूत करण्याचे काम करतात. तसेच गरोदरपणात महिलांच्या पायांना सूज आल्यास पैंजणांमुळे यापासून आराम पडतो.

असे म्हटले जाते, महिलांच्या पायात जमा होणारी चरबी देखील या पैंजणांमुळे नियंत्रणात राहते. याशिवाय पैंजण घातल्याने महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते. म्हणूनच त्या स्वतःची पर्वा न करता संपूर्ण कुटुंबाला सांभाळत असतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)