Adulterer salt : मीठ हे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे – ते अन्नाची चव वाढवते, जास्त दिवस अन्न टिकवण्यास मदत करते. मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड! मिठामध्ये ४०% सोडियम आणि ६०% क्लोराइड असतं. सोडियम आपल्या शरीरातील पाण्याची पातळीचे योग्य संतुलन राखण्यासाठी मदत करते. २.३ ग्रॅम इतकेच सोडियमचे प्रमाण शरीराला आवश्यक होते, असे यापूर्वी मानले जायचे. आता १.५ ग्रॅम हे आवश्यक मिठाचे प्रमाण आहे, अशी मान्यता आहे. मीठ हा आपल्या रोजच्या आहारातील एक आवश्यक घटक आहे शरीरात खनिजे संतुलित करण्यासाठी मीठ हे एक महत्त्वपूर्ण तत्व आहे. मीठ हे आपल्या आरोग्यासाठी इतके आवश्यक आहे पण जर तुम्ही भेसळयुक्त मीठ खात असाल तर तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पण मिठात भेसळ झाली आहे हे कसे ओळखावे?

मीठात भेसळ कशी ओळखावी?

बटाटे वापरा

Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?

शुद्ध आणि भेसळयुक्त मीठ ओळखण्यासाठी तुम्ही बटाट्याची मदत घेऊ शकता. अशा स्थितीत एक मोठा बटाटा मधोमध कापून त्यावरमीठ टाका. काही वेळाने मिठावर लिंबाचा रस घाला. अशा परिस्थितीत मीठ भेसळीमुळे रंग बदलेल. त्याच वेळी, वास्तविक मीठातून कोणताही रंग बाहेर येणार नाही.

हेही वाचा – माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

गरम पाण्याची मदत घ्या

गरम पाण्याचा वापर करून तुम्ही शुद्ध आणि भेसळयुक्त मीठ ओळखू शकता. अशावेळी कढईत १ कप पाणी गरम करा. आता त्यात १ चमचा लिंबाचा रस घाला. यानंतर पाण्यात मीठ टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. यामुळे शुद्ध मीठ पाण्यात लगेच विरघळते. त रभेसळयुक्त मीठ केवळ रंग गमावत नाही तर विरघळण्यासही वेळ लागतो.

कापूस वापरून ओळखा

कापसाच्या साहाय्याने तुम्ही शुद्ध आणि भेसळयुक्त मीठ देखील ओळखू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस काढा. आता कापूस लिंबाच्या रसात नीट बुडवून घ्या. नंतर त्यावर थोडं मीठ टाका आणि थोडा वेळ राहू द्या. १० मिनिटांनंतर, भेसळयुक्त मीठाचा रंग निघून जाईल आणि ते हळूहळू विरघळेल. जर मीठ शुद्ध असेल तर ते त्याचा रंग सोडणार नाही आणि लगेच वितळण्यास सुरवात करेल.

हेही वाचा – “किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

भेसळयुक्त मीठ खाल्यास आरोग्यावर काय होतो परिणाम

भेसळयुक्त मीठ तयार केल्यानंतर त्यात नैसर्गिक आयोडीन राहत नाही. मीठामध्ये या नैसर्गिक आयोडीनच्या कमरतेमुळे थॉयरॉईड सारखे गंभीर आजार होऊ शकतात तसेच चयपचयासंबधीत समस्या निर्माण होतात.

नैसर्गिक स्वरुपामध्ये मिळणारे मीठ पांढरे नसते. बाजारात मिळणारी मीठ सहसा ब्लिच वापरून पांढरे केले जाते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. सामान्य पांढरे मीठ खाल्ल्याने ऊतींमध्ये द्रव जमा होतो ज्यामुळे किडनी स्टोन, पित्ताशयातील खडे, होऊ शकतात. एवढेच नाही तर शुद्ध मीठ पचनासंबधित एंजाईम निर्माण करण्यासाठी चालना देतात जे आपल्या आहारातून पोषक तत्व काढण्यास मदत करते.

Story img Loader