बर्‍याच वेळा कपाळाची त्वचा उर्वरित चेहऱ्यापेक्षा जास्त गडद दिसू लागते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे कपाळावरील लहान नको असलेले केस. ही समस्या फक्त महिलांसमोरच नाही तर पुरुषांसमोरही येते. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते, आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. यामुळे बरेच लोक हे केस काढण्यासाठी कपाळावर थ्रेडिंग देखील करतात. तर कपाळावरील लहान केस आणि काळेपण साफ करण्यासाठी अनेक लोकं घरगुती उपाय शोधतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्हीही या समस्येपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल. कपाळावर नको असलेले केस आणि काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही अगदी सोपे घरगुती उपाय करू शकता. चला तर हे घरगुती उपाय जाणून घेऊयात

बेसन-दूध

कपाळावरील नको असलेले केस काढण्यासाठी आणि काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही दूध आणि बेसनाची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही एक चमचा बेसन दोन-तीन चमचे दुधात मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट कपाळावर लावा आणि दोन मिनिटे सोडा. जेव्हा ही पेस्ट सुकू लागते तेव्हा बोटांच्या मदतीने कपाळावरील पेस्ट चोळा आणि स्वच्छ करा. यामुळे नको असलेले केसही दूर होतील, त्याचबरोबर त्वचेवरील काळपटपणाही दूर होण्यास सुरुवात होईल.

बटाटा-मध

बटाटा आणि मध तुमच्या कपाळावरील अनावश्यक केस आणि त्वचा काळेपणा दूर करण्यास मदत करेल. यासाठी कच्चा बटाटा बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर दोन चमचे मध आणि चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट कपाळावर लावा. जेव्हा ते सुकू लागते, ते आपल्या बोटांनी हळूवारपणे चोळा. यामुळे तुमची समस्या दूर होईल.

कोरफड-अंडी

कोरफड आणि अंड्यांच्या मदतीने तुम्ही कपाळावरील नको असलेले केस आणि काळेपणापासून सुटका मिळवू शकता. यासाठी एक अंड्यामधील पांढरे गर घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल मिसळा. नंतर दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि कापसाच्या गोळयाच्या मदतीने कपाळावर लावा. आता लावलेली पेस्ट सुकते तेव्हा हलकया हाताने काढा. याने तुम्हाला कपाळावरील नको असलेले केस आणि त्वचेवरील काळेपणा दूर होण्यापासून सुरुवात होते.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you suffering from forehead hair and blackness so try this home remedy scsm