आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक गृहिणी याकडे विशेष लक्ष असते. मात्र, घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी घरातील झुरळ काही जायचं नाव घेत नाहीत. शिवाय झुरळं नाहीत असं एकही घर शोधून सापडणं कठिण आहे. झुरळं कधी कधी जेवण बनवताना एखाद्या पदार्थात पडतात आणि अन्न खराब करतात. अनेकांना तर झुरळांची खूप भिती वाटते तर काहींना त्यांचा किळस येतो. पण सर्वात मोठी अडचण ही आहे की, त्यांना मारण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते पुन्हा ते आपणाला घरात दिसतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यावर उपाय सांगणार आहोत.

झुरळ मारण्यासाठी बाजारात विविध केमिकल्स उपलब्ध आहेत, पण हे केमिकल्स आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कारण झुरळांचा मुख्य वावर हा स्वयंपाक घरात असतो आणि स्वयंपाक घरात अशा केमिकल्सचा वापर केल्यास खाद्यपदार्थांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, आता केमिकल्सचा वापर न करता झुरळ घालवण्याचे काही घरगुती उपाय करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”

हेही वाचा- जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या

तमालपत्र पावडर –

स्वयंपाकघरातील झुरळांपासून सुटका करण्यासाठी २-३ वाळलेली तमालपत्र घ्या आणि त्यांची बारीक पावडर करा. ती पावडर ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे अशा ठिकाणी ठेवा. झुरळे तमालपत्राचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत. त्यामुळे या वासाने ते घरातून पळ काढतात.

लवंग –

हेही वाचा- धावल्याने शरीराला होतात हे फायदे, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला महत्वाचा सल्ला

लवंगाच्या उपाय करुनही तुम्ही झुरळांपासून मुक्ती मिळवू शकता. यासाठी १० लवंगा घ्या आणि त्यात कडुलिंबाचे तेल मिक्स करा. मग त्याचे मिश्रण स्वयंपाकघरात झुरळ ज्या ठिकाणमी लपतात त्या ठिकाणांवर शिंपडा. या मिश्रणाच्या तीव्र वासाने झुरळं किचनमधून पळ काढतील.

रॉकेल –

घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी रॉकेल तेलाचाही वापर करता येतो. यासाठी रॉकेल तेल बाटलीत भरून ज्या ठिकाणी झुरळ दिसतील त्या ठिकाणी ओता. या रॉकेलमुळे झुरळ घरातून पळ काढतात.ॉ

हेही वाचा- लहान मुलांसाठी किडनीची सूज बनू शकते मोठी समस्या, ‘ही’ लक्षणे दिसताच करा उपचार

बेकिंग सोडा –

स्वयंपाकघरातून झुरळे बाहेर काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील एक चांगला उपाय आहे. थोडा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात साखर घाला. यानंतर तो बेकिंग सोडा ज्या ठिकाणी जास्त झुरळे दिसतील त्या ठिकाणी ठेवा. यामुळे झुरळ घरातून पळून जातील.

(टीप: वरील माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader