How to Clean Refrigerator: घरातील फ्रिजमध्ये खाद्यपदार्थांसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या जातात. या सर्व वस्तूंमुळे फ्रिज वेळोवेळ स्वच्छ करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, कारण बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न किंवा फ्रिजमधील भाज्या खराब होतात आणि त्यामुळे त्याचा दुर्गंध फ्रिजमध्ये पसरतो. शिवाय त्यामुळे फ्रिजमध्ये बॅक्टेरियाची वाढ मोठ्या प्रमाणात होते, जे इतर खाद्यपदार्थांवर परिणाम करू शकतात.

घरच्या घरी फ्रिज कसा स्वच्छ कराल?

फ्रिजची साफसफाई करणं अनेकांना खूप अवघड वाटतं, पण आज आम्ही तुम्हाला फ्रिज स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आजारी पडण्यापासून वाचवू शकता.

फ्रिज साफ करण्यासाठी आवश्यक वस्तू

  • सुती कापड
  • अर्धी बादली पाणी
  • खाण्याचा सोडा
  • १ चमचा डिटर्जंट

फ्रिज असा करा स्वच्छ

फ्रिज साफ करण्यापूर्वी सर्वप्रथम त्याचा स्विच बंद करणे आवश्यक आहे. स्विच अनप्लग केल्याशिवाय फ्रिज स्वच्छ करू नका. त्यानंतर फ्रिज पूर्ण रिकामा करा. यासोबतच फ्रिजच्या दारांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सर्व वस्तू काढून घ्या. आता सुती कापड पाण्यात भिजवून ते पिळून घ्या. कापडच्या मदतीने तुम्ही आता फ्रिज व्यवस्थित स्वच्छ करू शकता.

बेकिंग सोडा आणि डिटर्जंट

बेकिंग सोडा आणि डिटर्जंटच्या मदतीनेही तुम्ही फ्रिज साफ करू शकता. यासाठी एका बाटलीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि समान प्रमाणात डिटर्जंटच्या मदतीने मिश्रण तयार करा. आता रेफ्रिजरेटरमधील हट्टी डागांवर आणि सुती कापडावर फवारणी करून तुम्ही या कापडाच्या मदतीने हट्टी डाग काढून टाका, अशा प्रकारे तुम्ही फ्रिज सहज स्वच्छ करू शकता.

वस्तूची एक्सपायरी डेट तपासा

सर्वात शेवटी फ्रिज साफ केल्यानंतर तो कोरड्या कपड्याने नीट पुसून घ्या, त्यामुळे फ्रिज कोरडा होईल. फ्रिजमध्ये काही वस्तू पुन्हा ठेवण्यापूर्वी प्रत्येक वस्तूची एक्सपायरी डेट तपासा, जेणेकरून फ्रिज साफ केल्यानंतर पुन्हा खराब होणार नाही.

हेही वाचा: गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ

दुर्गंध दूर करा

अनेक वेळा फ्रिज साफ करूनही त्यातील दुर्गंध जात नाही. हा दुर्गंध दूर करण्यासाठी व्हॅनिला अर्क कापसाच्या बॉलमध्ये घ्या आणि रेफ्रिजरेटरच्या मध्यभागी एका मोठ्या भांड्यात ठेवा. त्यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.