प्रत्येकच महिलेला सुंदर दिसायला आवडतं. चेहऱ्याप्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. मात्र, रोज डिटर्जंट पावडर आणि साबणानी कपडे धुण्यामुळे आपले हात कोरडे होतात आणि काही वेळेस त्यांना भेगाही पडतात. अशावेळी काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमचे हात पुन्हा मऊ, कोमल आणि सुंदर बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काही सोप्या पद्ध्ती

  • तेलाने मॉलिश करा
    कपडे स्वच्छ करताना डिटर्जंटमुळे हात खराब आणि कोरडे रुक्ष होतात. यासाठी आपण झोपण्यापूर्वी हाताला तेलाने मॉलिश करावी. हातासह हे बोटांना देखील निरोगी ठेवतात.
  • कोमट पाण्याने हात धुवा
    कोमट पाण्यामुळे हाताची त्वचा मऊ होते. यासाठी हात काही वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवा. नंतर हात स्वच्छ कापडाने नीट पुसून कोरडे करा व त्यानंतर हातांना क्रीम किंवा लोशन लावा.

हे ही वाचा : हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; होईल भयंकर आजार, वेळीच जाणून घ्या कशामुळे होतो हा त्रास

  • मॉइश्चरायजर वापरा
    रोज रात्री झोपण्यापूर्वी हात पाण्याने स्वच्छ धुवा व नीट कोरडे करा. नंतर हातांवर क्रीम, लोशन, मॉइश्चरायजर किंवा साय लावून नीट चोळा. यामुळे तुमचे हात मऊ होतील.
  • मधाचा वापर करा
    हातांना मऊ करण्यासाठी मधदेखील वापरू शकता. यासाठी हातावर मध लावा त्यानंतर १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने हात धुवा. यामुळे हात पूर्वीपेक्षा मऊ आणि गुळगुळीत झाल्याचे दिसून येईल.

हे ही वाचा : Lumpy Skin Disease: लम्पी त्वचा रोग माणसांना होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे व उपाय

  • कोरफडीचा रस लावा
    तुमच्या हातांच्या भेगा दूर करण्यासाठी कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल वापरणेही उपयुक्त ठरेल. हातावर कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमच्या हातांच्या भेगा दूर होतील.
  • दुधाचा वापर करा
    दुधात असलेले मॉइश्चरायजिंग घटक हातांना मुलायम बनविण्यासाठी साहाय्यक ठरतात. त्यासाठी कोमट दुधात हात बुडवून ठेवा. नंतर १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने हात धुवा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader