Home Remedies to relieve tired eyes: ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा संगणकावर बसून तासनतास काम करावे लागते. सतत लॅपटॉपचा वापर केल्याने आपल्या हातांच्या बोटांना आणि डोळ्यांना त्याचा त्रास होतो. विशेषतः डोळ्यांना लॅपटॉप किंवा संगणकाचा सततचा संपर्क येऊन डोळयांना थकवा जाणवतो आणि डोळे थकलेले दिसून येतात. जर तुम्हाला देखील कॉम्प्युटरवर बसून तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल किंवा तणाव जाणवत असेल तर काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोळ्यांना थकवा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांना विश्रांती द्या

जर तुम्हाला काम करत असताना सतत लॅपटॉप किंवा संगणकाचा वापर करावा लागत असेल तर त्यासाठी कॉम्प्युटरवर काम करत असताना थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. याने तुमचे डोळे दुखायचे कमी होतील. तसंच जर तुम्हाला तुमचे डोळे कोरडे होतायत असं वाटत असेल तर त्यासाठी आय ड्रॉप्स तुम्ही डोळ्यांसाठी वापरू शकता.

(हे ही वाचा: Pain Prevention: सतत टायपिंग केल्याने मनगट आणि बोटांमध्ये वेदना होऊ लागल्यात? तर ‘या’ टिप्स फॉलो करा, नक्कीच आराम मिळेल)

टी बॅग आय मास्क

डोळ्यांचा थकवा दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे टी बॅग. याचा वापर करण्यासाठी टी बॅग्सच्या पिशव्या काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून काढल्यानंतर बॅग सामान्य पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवा. या टी बॅगच्या वापराने डोळ्यांचा थकवा दूर होण्यासोबतच काळ्या वर्तुळाची समस्याही दूर होते.

बटाटा आणि पुदिन्याचा मास्क

सोललेल्या बटाट्यांसोबत पुदिन्याची काही पाने घेऊन दोन्ही बारीक करा आणि त्याची चांगली पेस्ट बनवा. या पेस्टचा रस काढा आणि कापूस किंवा कोणत्याही स्वच्छ कापडाच्या मदतीने डोळ्यांवर लावा. या मास्कने डोळ्यांचा थकवा सहज दूर होईल.

( हे ही वाचा: परदेशात प्रवास करायचा आहे? भारतीय व्हिसाशिवाय या ६० देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता, येथे यादी पहा)

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्याभोवती लावा. मात्र, याचा वापर करताना काहीवेळच डोळ्यांवर ठेवा नाहीतर लिंबामुळे जळजळ होऊ शकते. त्यानंतर थोड्या वेळाने डोळे सामान्य पाण्याने धुवा.

गुलाबपाणी

गुलाबपाणीच्या वापरामुळे डोळ्यांतील कोरडेपणा आणि थकवा येण्याची समस्या सहजपणे दूर करते. यासाठी कापूस किंवा कॉटन पॅड गुलाब पाण्यात बुडवा आणि काही वेळ हा डोळ्यांवर ठेवा. याने तुमच्या डोळ्यांना नक्कीच आराम मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are your eyes tired after hours of working on a laptop these home remedies will provide instant relief gps