शरीरातील कोणत्याही असामान्य गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तुमच्यासाठी ती मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्वचेच्या रंगातील बदलांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वेळा याच्या आधारे गंभीर आजारांचा प्राथमिक अवस्थेत शोध घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतात. सर्वांनी डोळे, त्वचा, लघवी, नखांचा रंग यावर सतत लक्ष ठेवले पाहिजे, त्यात काही असामान्य दिसले तर त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर जाणून घेऊया नखांच्या रंगात होणारा बदल आणि त्याच्याशी संबंधित धोके.काही प्रकरणांमध्ये, तुमचे नखे फिकट गुलाबी ऐवजी निळे किंवा काळे दिसू शकतात. सहसा, दुखापतीमुळे, त्वचेचा किंवा नखांचा रंग निळा होतो, तरीही तुम्हाला दुखापत होत नसली तरीही तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील, तर याबाबत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. काही प्रकरणांमध्ये, सायनोसिस नावाची समस्या नखाच्या निळ्या रंगाचे मुख्य कारण म्हणून पाहिले जाते.
तुमची नखेही निळी होत आहेत का? हे गंभीर फुफ्फुस-हृदय रोगाच लक्षणं असू शकत, वेळीच सावध व्हा
शरीरातील कोणत्याही असामान्य गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तुमच्यासाठी ती मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-08-2022 at 12:51 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are your nails turning blue too these may be symptoms of serious lung cardiovascular disease gps