Pain Prevention: तुम्ही ऑफिसमधून काम करत असाल किंवा घरातून. जर तुम्हाला दररोज ८ ते ९ तास संगणकासमोर कीबोर्ड सोबत घालवावे लागत असतील तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. याचे कारण असे की लोक सहसा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरताना पॉश्चर चुकीचा ठेवतात, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता वाढते. तुम्‍ही कीबोर्डचा नीट वापर न केल्‍यास, तुम्‍हाला अनेकदा तुमच्‍या पाठीत, कंबरेत, हाताला, डोळ्यात आणि पायांमध्ये वेदना आणि जडपणा येतो. जर याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले तर ते संधिवात आणि टेंडिनाइटिसमध्ये बदलू शकते. त्यामुळे याची वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. तर जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही सततच्या टायपिंगमुळे
होत असलेल्या वेदनांना आराम देऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमची पाठ नेहमी सरळ ठेवा

जेव्हा तुम्ही कामाला बसता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला अनेक तास बसून काम करावे लागेल, त्यामुळे पाठ सरळ ठेवा आणि वाकवू नका. जर तुम्ही वाकून बसलात, तर शिफ्ट संपेपर्यंत तुम्हाला मान, पाठ आणि पाठदुखी जाणवेल. बसताना मान, पाठीचा कणा सरळ ठेवा, पाठीला खुर्चीचा आधार द्या.

( हे ही वाचा: monsoon tips: पावसाळ्यात त्वचेला उठणाऱ्या खाजेमुळे हैराण आहात? ‘या’ घरगुती उपायांमुळे त्वरित आराम देईल)

संगणक दूर ठेवा

बरेच लोक काम करताना लक्ष देत नाहीत आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये घुसून काम सुरू करतात. त्यामुळे पॉश्चरसह डोळ्यांनाही इजा होते. यासाठी संगणकाची स्क्रीन २० इंच दूर ठेवा. तसेच, स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या पातळीवर असावी जेणेकरून बसताना पॉश्चर खराब होणार नाही.

खुर्चीची उंची निश्चित करा

सर्व प्रथम, काम करण्यासाठी एक आरामदायक खुर्ची खरेदी करा. नंतर तुमच्या कीबोर्डच्या पातळीवर खुर्चीची उंची सेट करा. आर्म रेस्टला देखील समायोजित करा जेणेकरून तुमचे खांदे आरामशीर राहतील.

( हे ही वाचा: परदेशात प्रवास करायचा आहे? भारतीय व्हिसाशिवाय या ६० देशांमध्ये तुम्ही जाऊ शकता, येथे यादी पहा)

जेल पॅड वापरू नका

जेल पॅड हात आणि मनगटासाठी आरामदायक म्हणून विकले जातात. जर तुम्ही देखील याचा वापर करत असाल, तर तसं करू नका कारण ते मनगटावर आणि तळहातांवर अनावश्यकपणे दबाव टाकतात, ज्यामुळे सुन्नपणा आणि वेदना होतात.

अर्गोनॉमिक कीबोर्ड वापरा

अर्गोनॉमिक कीबोर्ड मनगट आणि बोटांना उत्तम प्रकारे संरेखित करण्यात मदत करतो, ज्यामुळे तुमची बोटे कीबोर्डवर व्यवस्थित पसरू शकतात. कीबोर्ड वापरताना, मनगट योग्य ठिकाणी ठेवा.

( हे ही वाचा: उभे राहून दूध आणि बसून पाणी का प्यावे? जाणून घ्या आयुर्वेदाचे नियम काय सांगतात)

वेळोवेळी ब्रेक घ्या

सतत काम करू नका कारण यामुळे हात दुखतील, दर अर्ध्या तासाने ब्रेक घेणे चांगले. टायपिंग व्यतिरिक्त इतर कामे पूर्ण करा, जसे की कॉल करणे, एखाद्याला भेटणे. यामुळे तुमच्या मनाला तसेच हातांना आवश्यक ब्रेक मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are your wrists and fingers aching from constant typing so follow these tips gps