Parenting Tips: सर्व पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करते. ते आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवू इच्छितात जी भविष्यामध्ये यश मिळवून देऊ शकते. पण जेव्हा प्रश्न मुलींचा येतो तेव्हा अशाच काही आवश्यक गोष्टी असतात जर तुम्ही तुमच्या मुलींवर संस्कार करताना शिकवल्या तर त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते. तर चला तर मग जाणून घेऊ या काही अशा गोष्टी ज्यांना या मुलींवर संस्कार करताना पालक म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
मुलींवर कसे संस्कार करावेत?
नेहमी लक्षात ठेवा की, तुम्हाला मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कधीही करू नये. याचा नकारात्माक परिणाम तुमच्या मुलींवर पडू शकतो. कारण मुलं सर्व काही पालकांकडून आणि घरातील वातवरणामधून शिकतात.जर घरातच मुलींसह भेदभाव करत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवतील?
हेही वाचा – शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र का खाऊ नये? शरीरावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
मुलींना कधीही कमी लेखू नका
तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागते की, मुलींना कधीही कमी लेखू नये. असे केल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि मानसिकरित्या त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आर्थिकदृष्ट्या मुलींना आत्मनिर्भर बनवा.
मुलींना लहानपणीपासूनच या गोष्टीची माहिती द्या की, त्यांना आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहू द्या. त्यांना आत्मनिर्भर व्हायला शिकवा. त्यांना इतरांवर अवलंबून राहू नये हे शिकवा.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवा
अनेकदा आई-वडील आपल्या मुलींना बहूतेकदा जास्त बोलू देत नाही. त्यांना मोकळेपणाने हसण्यास मनाई करतात. असे करण्याऐवजी त्यांना शिकवा की, कधीही त्यांच्यासह चुकीचे वर्तन झाले किंवा कोणीही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला किंवा शारीरिक मानसिक छळ केला असेल तर त्याविरोधात त्यांना आवाज उठवायला शिकवा.
हेही वाचा – रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कसा टाळू शकतात?
मुलींना काय सांगायचे ते ऐकून घ्या
जर तुमच्या मुलींना तुम्हाला काही सांगायचे आहे, त्यांची एखादी वैयक्तिक गोष्ट सांगायची असेल तर त्यांच्या बद्दल कोणतेही मत न तयार न करता त्यांचे मत आधी नीट ऐकून घ्या. मग तुमच्या मुलीला प्रेमाने काय चुकीचे आणि काय बरोबर ते सांगा. पण निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य मुलींनाच द्या.