डॉ. अविनाश फडके

भारतामध्ये पुरूषांमध्‍ये प्रोस्‍टेट कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. फुफ्फुसाच्‍या व तोंडाच्‍या कर्करोगांनंतर हा तिसरा सर्वात जास्‍त आढळणारा कर्करोग बनला आहे. प्रोस्‍टेट कर्करोगाचा प्रामुख्‍याने प्रोस्‍टेट ग्रंथीच्‍या पेशींवर परिणाम होतो. प्रोस्‍टेट ग्रंथी पुरूषांच्‍या प्रजनन कार्यामध्‍ये महत्‍त्‍वाची भूमिका बजावते. सामान्‍यत: ६५ वर्षांवरील पुरूषांमध्‍ये प्रोस्‍टेट कर्करोग आढळून येतो. पण आज हा कर्करोग ४० ते ५० वर्षे वयोगटातील तरूण पुरूषांमध्‍ये आढळून येत आहे.

चिन्‍हे व लक्षणे
काहीवेळा प्रोस्‍टेट कर्करोगाची लक्षणे वाढत्‍या वयानुसार होणा-या आजारांच्‍या लक्षणाप्रमाणे असू शकतात. म्‍हणूनच खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरित डॉक्‍टरांचा किंवा युरोलॉजिस्‍टचा सल्‍ला घ्‍यावा –

– सतत लघवीला होणे
– लघवी करताना त्रास होणे
– लघवी करताना जळजळ होणे
– लघवी किंवा वीर्यामधून रक्‍त येणे

सामान्‍य चाचणी पद्धती
प्रोस्‍टेट कर्करोगासंदर्भात चाचणी करण्‍यासाठी “PSA” नावाची पारंपारिक रक्‍तचाचणी केली जाते. पीएसए चाचणी प्रोस्‍टेट ग्रंथीमध्‍ये निर्माण होणारे प्रोटीन प्रोस्‍टेट स्‍पेसिफिक अॅन्‍टीजन (पीएसए) उपस्थित असल्‍याचे निदान करते. पीएसए पातळी ४.० ng/mL पेक्षा अधिक असल्‍यास कर्करोग होण्‍याचा धोका असतो.
तसेच प्रोस्‍टेटमध्‍ये कर्करोगाच्‍या पेशी असल्‍याच्‍या खात्रीसाठी बायोप्‍सी करावी लागते. पण पीएसए पातळ्या उच्‍च असल्‍यास अनेकवेळा नॉन-कॅन्‍सरस प्रोस्‍टेट आजार असल्‍याचे दाखवू शकते, ज्‍यामुळे वेदनादायी व अनावश्‍यक बायोप्‍सीस केल्‍या जातात.

आधुनिक युगातील चाचणी
आज कमी पीएसए असलेल्‍या पुरूषांमध्‍ये देखील कर्करोग होऊ शकतो. तर उच्‍च पीएसए असलेल्‍या पुरूषांना कर्करोग होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही. म्‍हणूनच एकाच पीएसए चाचणीच्‍या आधारावर प्रोस्‍टेट कर्करोगाचे निदान करणे हे चुकीचे ठरू शकते.
सर्वात परिणामकारक चाचणी आहे प्रोस्‍टेट हेल्‍थ इंडेक्‍स (पीएचआय). या चाचणीला अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रमाणित केले आहे. यामध्‍ये तीन रक्‍तचाचण्‍या केल्‍या जातात –

– पीएसए
– फ्री पीएसए
– पी२पीएसए

सर्व तिन्‍ही चाचण्‍यांच्‍या परिणामांचे गणन एका प्राप्‍तांकामध्‍ये केले जाते ते म्‍हणजे पीएचआय प्राप्‍तांक. हे प्राप्‍तांक बायोप्‍सीसह प्रोस्‍टेट कर्करोगाचे निदान होण्‍याच्‍या शक्‍यतेबाबत अचूक माहिती देते. ट्यूमर एक्‍स्‍ट्रॅक्‍ट्समध्‍ये आढळून येणा-या (-२)प्रोपीएसए नावाच्‍या विशिष्‍ट प्रोटीनचे मापन केले जाते. या पद्धतीने पीएचआय चाचण्‍या कर्करोग असल्‍याचे आणि प्रोस्‍टेट कर्करोगाचा टप्‍पा व कर्करोग पसरलेल्‍या भागांचा अभ्‍यास करण्‍यासाठी बायोप्‍सीची गरज आहे की नाही याबाबत माहिती सांगतात.

पीएचआय चाचणी जवळपास ३० टक्‍के अनावश्‍यक व वेदनादायी बायोप्‍सीस कमी करू शकते. पीएसएच्‍या तुलनेत या चाचणीने जागतिक स्‍तरावर प्रोस्‍टेट कर्करोगाचे निदान करण्‍यासाठी स्‍वत:ला सिद्ध केले आहे.

ही चाचणी अधिककरून अमेरिकन व युरोपियन देशांमध्‍ये वापरली जाते आणि आता भारतात डॉ. अविनाश फडके पॅथ लॅब्‍स (Dr. Avinash Phadke Path Labs) येथे उपलब्‍ध आहे.

Story img Loader