एका महत्त्वाकांक्षी प्रयोगात वैज्ञानिक मानवी स्कंद पेशीपासून तयार केलेल्या कृत्रिम रक्ताची चाचणी मानवावर घेतली जाणार आहे. २०१६ पर्यंत स्कंद पेशीपासून रक्त तयार करण्याची प्रक्रिया औद्योगिक पातळीवर सुरू करण्यात आली असून हे कृत्रिम रक्तदान केलेल्या रक्ताची जागा घेऊ शकेल.
स्कॉटिश नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन सव्र्हिस या संस्थेचे वैद्यकीय संचालक मार्क टर्नर यांनी सांगितले की, आम्ही प्रथमच मानवी शरीरात स्वीकारल्या जातील अशा लाल रक्तपेशी तयार केल्या आहेत. यापूर्वी तसे करता आले नव्हते. ५० लाख पौडांच्या या प्रकल्पाचे नेतृत्व एडिंगबर्ग विद्यापीठ करीत आहे. पहिल्यांदा थॅलेसिमिया असलेल्या रुग्णांना हे कृत्रिम रक्त दिले जाईल. त्यांना पाच मि. लि. एवढय़ा प्रमाणात रक्त देऊन पेशींचे वर्तन कसे राहते याचा अभ्यास केला जाणार आहे.
या चाचणीचा अर्थ लोकांनी रक्तदान करणे थांबवावे असा नाही कारण कृत्रिम रक्त सुरळितपणे वापरले जाण्यास अजून वीस वर्षांचा कालावधी लागेल. प्लुरिपोटेंट म्हणजे बहुअवयव निर्मितीक्षम स्कंद पेशींपासून लाल रक्तपेशी मिळवताना प्रौढ त्वचा किंवा रक्तपेशी यांना जनुकीय तंत्राने स्कंद पेशीसारख्या स्वरूपात बदलावे लागेल.
बहुअवयव निर्मितीक्षम स्कंदपेशी विशिष्ट जैवरासायनिक स्थिती ठेवून त्यात मानवी शरीरातील स्तिती प्राप्त करावी लागेल त्यामुळे पुढे परिपक्व रक्तपेशी तयार होतील. यातील वापरयोग्य पेशी या अपरिपक्व रक्तपेशींपासून वेगळ्या काढल्या जातील. आतापर्यंत ४०-५० टक्के परिपक्व लाल रक्तपेशी मिळवण्यात यश आले असून त्या मिळवण्यास एक महिना लागला. ओ निगेटिव्ह हा दुर्मीळ रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या पेशींपासूनच असे कृत्रिम रक्त बनवून ते रुग्णाच्या शरीरात घालता येईल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
कृत्रिम रक्ताची चाचणी मानवावर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
एका महत्त्वाकांक्षी प्रयोगात वैज्ञानिक मानवी स्कंद पेशीपासून तयार केलेल्या कृत्रिम रक्ताची चाचणी मानवावर घेतली जाणार आहे.
आणखी वाचा
First published on: 15-04-2014 at 12:58 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial blood to be tested on humans