‘स्लॉ’ हा सलाडचाच एक प्रकार आहे. सँडविचसोबत याची चव काही औरच असते. स्लॉमध्ये कोबी, गाजर, ढोबळी मिरची, व्हिनेगर वापरतात. परंतु इथे आपण एक वेगळा प्रयोग केला आहे. या सलाडमध्ये गोड चव असलेला मिरची सॉस वापरला आहे. याला आंबट-गोड चव असते. ही चव आणायची असेल तर भेळेत वापरलेली चिंच चटणीही वापरता येते. गोड मिरची सॉस बनविण्यासाठी १ वाटी मध, १ टेबलस्पून व्हिनेगर आणि पाच ते सहा ताज्या लाल मिरच्या चिरून मिसळाव्या.

साहित्य

  • १ पॅकेट सुके नूडल्स
  • १०० ग्रॅम कोबी
  • १०० ग्रॅम पातीचा कांदा
  • २ चमचे मिरची सॉस
  • पुदिन्याची पाने
  • भाजलेले शेंगदाणे

कृती

नूडल्स उकडून घ्या. त्यानंतर कोबी आणि पातीचा कांदा चिरून घ्या. नूडल्स, भाज्या एकत्र करा. त्यावर सॉस पसरवा, पुदिन्याची पाने आणि शेंगदाणे यांचे मिश्रण करा.

हे नूडल्स कणकेच्या वा तांदळाच्या पिठाचे असल्यास या सलाडमधून परिपूर्ण आहार मिळू शकतो.

nilesh@chefneel.com