-पंकज भोसले
मद्य आणि मनमुराद समुद्रकिनारा ही गोव्यात जाणाऱ्या बहुतांश हौशी आणि गुलछबू पर्यटकांचे आकर्षण असते. कुटुंबकबिला घेऊन गोव्याची भटकंती करण्याची हौस फार कमी जण बाळगतात. चित्त आणि चक्षू यांना परमोच्च समाधान देणारा आणि गोव्याच्या पारंपरिक मौजेला बगल देत संपूर्ण कुटुंबला सुखदायी, निसर्गसमृद्ध अनुभूती देणारा उत्तम पर्याय क्लब महिंद्राच्या अस्नोडा येथील रिसाॅर्टच्या निमित्ताने उपलब्ध झाला आहे.
चव्वेचाळीस एकरच्या या एकूण जागेतील ११ एकरचा भाग २०० सुसज्ज आणि अत्याधुनिक निवासस्थळांसह उभारताना वृक्ष लागवड, सौरऊर्जा प्रकल्प, स्वयंपूर्ण जलसाठा आणि प्राणी-पक्षी संपदेला किंचितही धक्का न लावता केलेली इंडो-पोतृगीज स्थापत्य रचना ही इथली लक्षवेधी बाब आहे. करोना काळात देशातील हाॅटेल आणि पर्यटन उद्योगाला जबरदस्त तडाखा बसला. अनेक बड्या प्रकल्पांनी आपल्या यंत्रणा कमी केल्या. नवी गुंतवणूक थांबवली.
मात्र अस्नोडासारख्या समुद्रकिनाऱ्यांपासून थोड्या वेगळ्या पडलेल्या समृद्ध निसर्गाने संपन्न भागात क्लब महिंद्राची वेगळ्या संकल्पनांवर आधारित रिसाॅर्टची उभारणी सुरू होती. गेल्या वर्षी करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर या रिसाॅर्टने करोनाच्या सुरक्षा नियमांचे कठोर पालन करीत पर्यटकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. या वर्षभरात गोव्याची भिन्न अनुभूती देणारा यशस्वी प्रकल्प म्हणून त्याची पर्यटकांकडून, क्लब महिंद्रा सदस्यांकडून ओळख निर्माण झाली आहे.
आकर्षण काय ?
इथे कुटुंबाला घेऊन येण्याची किमान डझनभर आकर्षण केंद्रे आहेत. बालकांपासून पालकांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत सर्वांना सक्रिय ठेवणारे खेळ, वाॅटरपार्क, पक्षीनिरिक्षण, ट्रेकिंग, सायकलिंग, राॅकस्पोर्टससारखे धाडसी उपक्रम ज्यांची संकल्पना ही ‘जंगलबुक’ आणि ‘ मॅनइटर इन कुमाऊ‘सारख्या अभिजात कलाकृतींमधून तयार करण्यात आली आहे. यासह संध्याकाळी वेगवेगळ्या थिम इव्हेण्ट्नी कुटुंबांतील प्रत्येक सदस्याचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांची फौज येथे असल्यामुळे इथली मनमौज येणाऱ्या प्रत्येकाला समाधान देणारी आहे. या सगळ्यानंतर आखण्यात येणारी भोजन व्यवस्था पारंपरिक गोव्यातील व्यंजनांसह देशोदेशीच्या डिशेशनी संपृक्त अशी आहे.
दर्शनी आणि आंतरिक सौंदर्य…
हा रिसाॅर्ट उभारताना इथल्या आधीच्या पारंपरिक आणि औषधी वृक्षांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात आली असून नव्याने अडीच हजार वृक्षांची भर घालण्यात आली आहे. एप्रिल-मे हा अमलताश किंवा बहाव्याचा बहर येण्याचा काळ. या रिसाॅर्टमध्ये शिरताच फुललेला बहावा आणि इतर झाडांची- त्यावरील फुलांची रंगसंगती ही आकर्षित करणारी आहे. सप्तपर्णी हे गोव्यातील महत्त्वाचे झाड या परिसरात सहज दिसतेच. पण हाॅर्नबील पक्ष्यांना आकर्षित करणारे आणि हे पक्षी बहुतांश अवलंबून असणारे फिशटेल पाम हे झाडही या परिसरात मुबलक दिसतात. प्रत्येक निवासाला असणाऱ्या सज्जा परिसरातून झाडांची-वेली वनस्पतींची रचना ही प्रसन्न करणारी आहे. आनंदाचा झरा अर्थात हॅपीहब…
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला गुंतवून ठेवणारा त्यांना योगाच्या धड्यांपासून आभासी खेळातील मौज घडवून आणणारा उपक्रम येथील हॅपीहबमध्ये करण्यात आला आहे. येथून इलेक्ट्रीक बाईक्स, सायकल्स घेऊन परिसराची व्यायामदायी रपेटही करता येते आणि संध्याकाळी विविध प्रकारच्या पक्ष्यांना पाहण्याची गंमतही साकारता येते. टेबल टेनिसपासून विविध प्रकारचे बैठे खेळ आणि भटकंतीला जाणाऱ्या पालकांच्या बालकांना सांभाळत त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी करणारा कुशल कर्मचारी वर्ग आहे.
दुर्मीळ वृक्षांचे जतन…
या रिसाॅर्टमध्ये केवळ कुटुंबासह मौजच करता येणार नाही, तर निसर्गातील कितीतरी आश्चर्यांची माहिती जाणून घेता येणे शक्य आहे. इंडिअन चारकोल, पक्ष्यांना सर्वाधिक आवडणारी सिंगापूर चेरी आणि विविध वनस्पतींची माहिती करून घ्यायची असेल, तर तेही सहज होऊ शकते. रात्री प्राणवायू सोडणाऱ्या स्नेक ट्रीसह खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाचे पांगारा हे वृक्ष येथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. पिंपळासारखा हुबेहूब दिसणारा इंडियन राॅकफीग (अंजिरासारखी फळे येणारे) अतीदुर्मीळ वृक्ष इकडे पहायला मिळतो. या वृक्षाला जपण्यासाठी येथील नाल्यावरील छोट्या पुलाच्या रचनेमध्ये प्रचंड आर्थिक मेहनत घेऊन बदल केल्याची माहिती इथल्या अभियंत्यांनी दिली. निसर्गाधिष्ठीत हेतू… हा!