वेळेआधीच जन्म झालेल्या मुलांमध्ये लहानपणीच दमा होण्याची दाट शक्यता असल्याचे एका नव्याने करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. जगभरातील वेळेआधीच जन्म झालेल्या दीड कोटी मुलांच्या पाहणीअंती ही बाब समोर आली आहे. नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलांपेक्षा अशा मुलांना दम्याचा किंवा दमासदृष्य आजारांचा धोका जास्त असल्याचा दावा या संशोधनावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी केला आहे.
त्याचबरोबर, शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलांमध्ये व त्यापेक्षाही लहान मुलांमध्ये दमा होण्याचा धोका असल्याचे मत एडीनबर्गह विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या धका धकीच्या जीवन शैलीमुळे अनेक मुलांचा जन्म वेळे आधीच होत असल्याचे आकडेवारी सांगते. या मुलांमध्ये दमा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नैसर्गिकरीत्या पूर्णवेळात जन्मलेल्या मुलांमध्ये दमा होण्याचे प्रमाण ८ टक्के आहे. हेच प्रमाण वेळेआधी जन्मलेल्या मुलांमध्ये १४ टक्के असल्याचे या संशोधनातून समोर आले.              
वेळेपेक्षा आधी तीन आठवडे जन्म झालेल्या मुलांमध्ये दमा होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे देखील हा अभ्यास म्हणतो.
पालक आणि डॉक्टरांसाठी या संशोधनाचा फायदा होणार असून, मुलांचा जन्म वेळेआधी होण्यापूर्वी घ्यायच्या काळजीसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा