Asthma: दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फूसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे असं समजावं. दमा हा आजार अनुवांशिकतेनं अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराचं लक्षणं असल्याचं दिसून येऊ शकतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अस्थमा किंवा दमा हा एक कॉमन आजार आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो. दम्याचं दुखणं म्हणजे क्रॉनिक आजार असं समजलं जातं. म्हणजे खूप दिवसांपासून असलेला आजार. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येत असतात. या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांनी अशा परिस्थितीत कोणत्या पदार्थांचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊया.

आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश करा

– व्हिटॅमिन डी

दम्याबाबत आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास प्रौढ आणि लहान मुलांमध्ये दम्याचा धोका वाढतो. इतकंच नाही तर फुफ्फुसाच्या कार्याला मदत करण्यासोबतच, व्हिटॅमिन डी सर्दी सारख्या श्वसन संक्रमणांना देखील दूर ठेवते. दररोज व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट घेतल्याने दम्याचा तीव्र झटका येण्याचा धोकाही कमी होतो. म्हणून, दही, संत्र्याचा रस, सॅल्मन आणि ट्यूना सारखे मासे, मशरूम, अंड्यातील पिवळा बलक, चीज आणि व्हिटॅमिन डीने परिपूर्ण असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे.

आणखी वाचा : Heart Attack: जिममध्ये व्यायाम करताना ‘या’ गोष्टी टाळा! अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

– ताजी फळे आणि पालेभाज्या

फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा सकस आहार ठेवल्यास दम्याच्या समस्येला आळा घालता येतो. ताजी फळे आणि भाज्यांचे अधिक सेवन केल्यास लहान मुलांमध्ये तसेच प्रौढांना दम्याचा आजार होण्याचा धोका कमी होतो. सफरचंद, केळी अशी काही फळे आहेत जी अस्थमाच्या रुग्णांनी जरूर खावीत. गाजर, पालक, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली आणि रताळे यांचा अवश्‍य आहारात समावेश असावा.

– संपूर्ण धान्य

ओट्स, गव्हाचे पीठ, लापशी, संपूर्ण गव्हापासून तयार झालेले अन्न खायला हरकत नाही. संपूर्ण गव्हापासून बनवलेला पास्ता आदी संपूर्ण धान्य दम्याची लक्षणे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

बदाम, काळी मिरी आणि साखर

बदाम – १०० ग्रॅम, काळी मिरी – २० ग्रॅम आणि साखर – ५० ग्रॅम.

दम्याच्या रुग्णांनी प्रथम बदाम, काळी मिरी आणि साखर एकत्र करून पावडर बनवून घ्या. त्यानंतर १ चमचे पावडर दुधात मिसळा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यातून तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बदाम, मिरपूड आणि साखर यांची पावडर बनवून घट्ट डब्यात ठेवू शकता. असे केल्याने तुमची रोज पावडर बनवण्याचे टेन्शन दूर होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asthma sufferers just drink these 3 things mixed with milk pdb
Show comments