ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी स्थान बदलत असतो. ग्रहांनी आपलं स्थान बदललं की त्याचे परिणाम त्या त्या राशीच्या लोकांवर होत असतात. २९ डिसेंबर रोजी बुध मकर राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. या राशीतील बुधाचे संक्रमण अनेक राशींसाठी खास असणार आहे. परंतु मुख्यतः चार राशीच्या लोकांना या संक्रमणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल.

मेष: सरकारी नोकरी करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. हा काळ अकाउंटंट्स, फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगसाठीही अनुकूल असणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्या कामासाठी शुभ राहील. या काळात तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल.

वृषभ: या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण खूप चांगले जाईल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्याची योजना आखू शकता. पैसे जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही वकील किंवा न्यायाधीश म्हणून काम करत असाल तर बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ राहील. यावेळी तुमचा कल धार्मिक कार्याकडे अधिक असेल.

Grahan 2022: नव्या वर्षातील सूर्य, चंद्र ग्रहणांची वेळ आणि तारीख, सुतक कालावधी जाणून घ्या

कन्या: या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल. या दरम्यान तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता. लिहिण्याची व बोलण्याची क्षमता सुधारेल. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत उत्साहवर्धक परिणाम मिळतील.

वृश्चिक: बुधाचे संक्रमण तुमच्यासाठीही शुभ सिद्ध होईल. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. पगारात वाढ करण्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल ठरेल. प्रवासातूनही तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

Story img Loader