ज्योतिष्यशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचं होणारं परिवर्तन राशींवर प्रभाव टाकत असतो. त्यामुळे प्रत्येक राशींच्या लोकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला खूपच महत्व आहे. १९ डिसेंबरपासून शुक्र राशीची मकर राशीत वक्री चाल सुरु झाली आहे. कुंडलीतील ज्या स्थानावर शुक्राची शुभ दृष्टी असते तिथे चांगली फळ मिळतात. धन, वैभव, ऐश्वर्य आणि सर्व सुख मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. दुसरीकडे, शुक्राची अशुभ स्थिती लोकांना गुप्त रोग, प्रेम आणि जीवनातील सुखसोयीपासून वंचित ठेवू शकतात. शुक्राची वक्री चाल २९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर शुक्र मार्गस्थ होईल.
शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. शुक्र मीन राशीत उच्च आणि कन्या राशीत क्षीण मानला जातो. शुक्र ग्रह आनंद आणि समृद्धीचा कारक देखील आहे. जीवनात प्रेम मिळविण्यासाठी शुक्र ग्रहाची स्थिती कारण ठरते. मकर राशीतील शुक्र ग्रहाची वक्री चाल मेष, वृषभ, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ मानली जाते. शुक्राच्या वक्री चालीमुळे धनु राशीच्या लोकांना या काळात बँक बॅलन्स आणि उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तर मीन राशीच्या लोकांनाही यामुळे फायदा होणार आहे.
Jyotish 2022: आपल्या राशीची कमकुवत बाजू जाणून घ्या आणि नव्या वर्षात निवारण करा
शुक्राच्या वक्री चालीमुळे पाच राशीच्या लोकांवर त्याचे नकारात्मक प्रभाव जाणवणार आहे. मिथुन राशीसाठी शुक्राची वक्री चाली अष्टम भावात असल्याने भविष्यातील घटनांबद्दल चिंता वाटेल. कर्क राशीच्या लोकांना याचा नकारात्मक परिणाम जाणवतील. तर सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना शुक्राच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.