ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. त्यात ठराविक कालावधीनंतर ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीत गोचर म्हणजेच त्या त्या राशीत भ्रमण करत असतो. त्याचे परिणाम १२ राशींवर जाणवत असतात. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. या सर्वांचा एक ना एक प्रकारे व्यक्तीवर परिणाम होत असतो. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यापासून राहू केतूपर्यंत सर्व ग्रहांची स्वतःची गती आहे. आपापल्या गतीनुसार सर्व ग्रहांना राशीमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. या वर्षअखेर प्रसिद्धी, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहे. शुक्र ३० डिसेंबरला मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ पर्यंत या राशीत त्याचं स्थान असणार आहे. यामुळे काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम जाणवणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींना नशिबाची साथ मिळणार आहे, जाणून घेऊयात.
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक राहील. या दरम्यान तुम्हाला क्षेत्रात प्रगती आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन वर्षात तुम्ही तुमची उद्दिष्टे देखील साध्य करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ- शुक्राचे संक्रमण तुम्हाला आनंद देऊ शकेल. या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या संक्रमणादरम्यान तुमचे संवाद कौशल्य वाढेल आणि बोलण्यात गोडवा येईल. तुम्ही सर्वांना प्रभावित करण्यात सक्षम व्हाल.
Rashi Parivartan 2022: नव्या वर्षात कोणते ग्रह करणार राशी परिवर्तन; जाणून घ्या स्थिती आणि परिणाम
कर्क- कर्क राशीच्या लोकांना शुक्राच्या परिवर्तन काळातील स्थितीने कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
वृश्चिक- शुक्राचे संक्रमण तुम्हाला आर्थिक आघाडीवर लाभ देईल. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.