ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही विशिष्ट कालावधीसाठी एका राशीत विराजमान असतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रहांचा १२ राशीत टप्प्याटप्प्याने भ्रमण होत असतं. त्यामुळे त्याचे परिणाम त्या त्या राशीच्या लोकांना जाणवत असतात. ज्योतिषशास्त्रात शनि आणि सूर्य या ग्रहांना एकमेकांचं शत्रू मानलं आहे. १४ जानेवारी २०२२ पासून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य या राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. मात्र या राशीत शनि ग्रह या आधीपासूनच उपस्थित आहेत. सूर्य मकर राशीत १३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत, तर शनि मकर राशीत २९ एप्रिल २०२२ पर्यंत असणार आहेत. त्यामुळे या दोन शत्रू ग्रहांची युती १४ जानेवारी २०२२ पासून १३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असणार आहे. हा कालावधी पाच राशींसाठी अनुकूल असणार आहे. या कालावधीत पाच राशींच्या लोकांना शुभ मिळतील.
मेष :- हा कालावधी मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.- या काळात नोकरीत प्रमोशन मिळण्याची आणि पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत आणि आरोग्यही चांगले राहील.
सिंह :- या काळात या राशीच्या लोकांना योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थिती सुधारेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात वैवाहिक आणि प्रेमसंबंध चांगले राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
तूळ :- तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला संपत्ती जमवता येईल. घरातील ज्येष्ठांच्या मदतीने मालमत्ता खरेदी करा. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
वर्ष २०२२ साठी नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी; सात घटनांचा केला आहे उल्लेख
वृश्चिक :- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमच्या संवाद कौशल्यातही सुधारणा होण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच हे संक्रमण आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी सकारात्मक असू शकते.
धनु राशी:- या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात जमा झालेला पैसा भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच ते पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या स्पर्धेत बक्षीसही जिंकू शकता.