ज्योतिषशास्त्रात राशी आणि ग्रह यांना महत्त्व आहे. त्यामुळे राशीचा गुणधर्म, स्वामी आणि ग्रहांचं परिवर्तन यावर प्रगतीचा आलेख अवलंबून असतो. कुंडलीत ग्रहांची आणि महादशेची मांडणी पाहून भविष्यबाबत सांगितलं जातं. प्रत्येक व्यक्ती स्वत:चं नशीब घेऊन जन्माला येतो. काहींना कमी प्रयत्नात सर्व काही मिळते, तर काहींना लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यामागे आपल्या ग्रह आणि नक्षत्रांचा दोष असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशी आहेत ज्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती भाग्यवान मानल्या जातात. त्यांना कमी वयात धन आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक भाग्यवान आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मेष: या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे. मेष राशीचे लोक भाग्याचे धनी मानले जातात. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात त्यांना यश मिळते. त्यांना खूप नशिबाची साथ मिळते. त्यांनी ठरवलेले काम एकदाच पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता आहे. लहान वयातच ते यशाची शिडी चढण्यात यशस्वी होतात.
  • वृश्चिक: या राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. हे लोक धैर्यवान असतात. जीवनात त्यांना जे हवे आहे त्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. त्यांना नशिबाची चांगली साथ मिळते. त्यांनी योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्यांना लहान वयात यश मिळते. आयुष्यात नावासोबतच पैसाही कमावतात.

नवं वर्ष २०२२ मध्ये ‘या’ चार राशीच्या लोकांना मिळणार भाग्याची साथ!, सरकारी नोकरी मिळण्याचा योग

  • मकर: या राशीचे लोक साहसी असतात. त्यांच्यावर शनिदेवाचा प्रभाव आहे. या राशीची लोकं मेहनती, प्रामाणिक, सहनशील असतात. त्यांचे नशीब चांगलं असतं. कोणत्याही क्षेत्रात हात आजमावून यश मिळवतात. त्यांना लहान वयातच नाव आणि प्रसिद्धी मिळते.
  • कुंभ: या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. या राशीचे लोक मेहनती आणि हुशार असतात. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून जीवनात चांगले पैसे कमवण्यात यशस्वी होतात. त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः चांगली आहे. त्‍यांच्‍या चांगल्या नशीबामुळे त्‍यांना कमी वयात यश मिळते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology four zodiac signs earn wealth and fame at young age rmt