Name Astrology: असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर खूप प्रभाव असतो. बहुतेक लोक त्यांच्या जन्म राशीनुसार नावे ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खास गोष्टींची माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे कळू शकेल का? त्याच्या आवडी-निवडी काय आहेत? त्याची कारकीर्द कशी असेल? इथे तुम्हाला अशाच काही अक्षरांबद्दल माहिती देणार आहोत, या अक्षरांनी ज्यांचे नाव सुरू होते ते लोक खूप भाग्यवान मानले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या लोकांचं नाव A अक्षराने सुरू होतं ते खूप मेहनती आणि धैर्यवान मानले जातात. त्यांचे नशीब खूप बलवत्तर असतं. आपलं म्हणणं स्पष्टपणे सांगण्यात ते पटाईत आहेत. ते त्यांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल खूप गंभीर असतात. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाला वाखाणण्यात येतं. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळतं.

ज्या लोकांचं नाव K अक्षराने सुरू होतं, त्यांचे नशीब देखील चांगलं मानलं जातं. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात ते यश मिळवतात. या लोकांना इतरांना मदत करायला आवडते. ते मुक्त विचारांचे असतात. ते आयुष्यात भरपूर पैसे कमावतात.

ज्या लोकांचं नाव M अक्षराने सुरू होतं ते देखील खूप भाग्यवान मानले जातात. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडतं. या लोकांना थोडे कष्ट करून चांगलं यश मिळतं. ते त्यांच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक असतात. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतं.

ज्या लोकांचं नाव T अक्षराने सुरू होतं ते खूप हट्टी असतात. एकदा ठरवलेल्या कामात यश मिळवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. ते कोणतेही काम विचारपूर्वक करतात. ते अतिशय बुद्धिमान मानले जातात. कोणीही त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतो.

ज्यांचं नाव P अक्षराने सुरू होतं त्यांची बुद्धी कुशाग्र मानली जाते. ते त्यांचे काम अतिशय हुशारीने करतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत जिंकायला आवडतं. त्यांची ही सवय त्यांना यशही मिळवून देते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. कामाच्या ठिकाणी त्यांची वेगळी ओळख होत असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology if the first letter of the name is one of these then you are lucky you can earn a lot in your career prp