येणाऱ्या नवीन वर्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. नवीन वर्षात अपूर्ण राहिलेले स्वप्न नव्या संकल्पाने पूर्ण व्हावेत अशी इच्छा असते. याशिवाय व्यक्तीला प्रत्येक कामात यश हवे असते. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशीमध्ये अशा काही कमतरता असतात, ज्यामुळे जीवनात कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही. या कमतरता दूर केल्या तर यश निश्चित आहे. जाणून घ्या १२ राशींच्या कमतरतेबद्दल.

मेष (Aries)

या राशीचे लोक दुसऱ्यांचा सूड घेण्यात पुढे असतात. स्पर्धात्मक भावनाही या राशीच्या प्रगतीत अडथळा ठरते. नवीन वर्षात सांघिक भावनेने काम करणे चांगले राहील. इतरांनाही पुढे जाण्याची संधी द्या.

Shani Gochar 2025
पुढील ४७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् नवी नोकरी मिळणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025 : २ फेब्रुवारीपूर्वी चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शनि, सूर्य, गुरूसह ५ ग्रहांच्या कृपेने आर्थिक लाभासह होईल करिअरमध्ये झपाट्याने प्रगती
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

वृषभ (Taurus)

अधिक पैशाची हाव ही या राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी असते. त्याच वेळी, या राशीचे लोक पैशाने इतरांची क्षमता मोजतात. नवीन वर्षात या वाईट सवयी बदला.

मिथुन (Gemini)

या राशीचे लोक इतरांवर टीका करण्यात आपला वेळ घालवतात. मिथुन राशीचे लोक विचार न करता इतरांना त्यांचे चांगले-वाईट सांगतात. नवीन वर्षात ही वाईट सवय बदलावी.

कर्क (Cancer)

कर्क राशीचे लोक खूप भावूक असतात. या राशीच्या लोकांना ते स्वतः एकटे वाटतात. एकटेपणामुळे नेहमीच भीती वाटते. नवीन वर्षात तुमची ही सवय बदला आणि सगळ्यात मिक्स व्हायचा प्रयत्न करा.

सिंह (Leo)

सिंह राशीचे लोक क्रोधित स्वभावाचे मानले जातात. अनेकवेळा रागामुळे त्यांचेच नुकसान होते. नवीन वर्षात ही वाईट सवय बदलणे चांगले होईल.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे करायची असते. कन्या राशीच्या लोकांना कोणाचाही सल्ला लवकर मानणे आवडत नाही. ते बदलले पाहिजे.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना दिखावा करणे आवडते. तूळ राशीच्या लोकांना दिसण्यामुळे उधळपट्टीची वाईट सवय लागते. नवीन वर्षात दिखाऊपणा टाळा.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीचे लोक इतरांमधील दोष शोधण्यात आघाडीवर असतात. कधीकधी स्वतःवर नियंत्रण नसल्यामुळे ते स्वतःचे नुकसान करतात. नवीन वर्षात यापासून दूर राहा.

धनु (Sagittarius)

या राशीचे लोक खोटे बोलण्यात जास्त पटाईत असतात. खोटे बोलल्यामुळे या राशीचे लोक अनेक वेळा फसतात. नवीन वर्षात खोटे बोलणे टाळा.

मकर(Capricorn)

या राशीच्या लोकांना इतरांचा द्वेष करण्याची वाईट सवय असते. नवीन वर्षात इतरांचा द्वेष करणे आणि इतरांचे वाईट करणे थांबवा.

कुंभ (Aquarius)

या राशीचे लोक मित्रांना मदत करण्यात पुढे असतात. कधीकधी मित्रांना अधिक आर्थिक लाभ दिल्याने त्यांच्यासाठी आर्थिक संकट निर्माण होते. नवीन वर्षात हे वाईट दूर करा.

मीन (Pisces)

या राशीचे लोक काल्पनिक दुनियेत हरवून जातात. या वाईट सवयीमुळे मीन राशीचे लोक इतरांचे ऐकत नाहीत. एवढेच नाही तर या राशीचे लोक स्वतःच्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला तयार नसतात, म्हणून २०२२ मध्ये अहंकार सोडा.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader