ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष मकर राशीसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. मकर राशीच्या लोकांना शेवटची अडीच वर्षांची साडेसाती सुरु असेल. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तुम्ही आनंदी जीवन जगाल. परंतु वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही धीर धरा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. २०२२ या वर्षाच्या शेवटी तुम्ही तुमचे अडथळे, समस्या आणि त्रास मुळापासून सोडवू शकाल.

मकर राशीच्या लोकांसाठी २०२२ ची सुरुवात म्हणजेच जानेवारी महिना चांगला जाण्याची अपेक्षा आहे. या काळात शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. त्याचबरोबर जानेवारी महिन्यातच संपूर्ण वर्षासाठी आपल्या खर्चाचे नियोजन आणि पैशाची बचत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला आपल्या जवळच्या आणि प्रियजनांवर पैसे खर्च करावे लागतील. मकर राशीच्या लोकांसाठी जोडीदाराच्या दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च सुखद राहण्याची अपेक्षा आहे. तसेच या काळात जे लोक अविवाहित जीवन जगत आहेत. त्यांनाही या काळात जीवनसाथी मिळू शकतो. तुमचे आचरण आणि समज या काळात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीकडे नेऊ शकते. फेब्रुवारीमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात करिअर वाढीच्या अनेक संधी अपेक्षित आहेत, पण निष्काळजीपणा केल्यास त्या गमावू शकता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

Jyotish Shastra: कपाळावर टिळा, गंध लावल्याने मिळतात शुभ संकेत, राशीनुसार असा लावाल तिलक

मकर राशीच्या लोकांसाठी मे आणि जून महिना जोडीदाराच्या दृष्टीने अनुकूल राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे प्रियकर/प्रेयसीसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. अनेक मकर राशीचे लोक या काळात त्यांचे प्रेम जीवन वैवाहिक जीवनात रूपांतरित करण्याचा विचार करू शकतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये, तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणण्यासाठी उपाय शोधण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान, आपल्या आहाराची काळजी घ्या. वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्हाला फायदे मिळू शकतात. मकर राशीच्या लोकांसाठीही हा काळ अनुकूल असण्याची अपेक्षा आहे. करिअर बदलण्यास किंवा स्थलांतर करण्यास इच्छुक असलेल्यांना संधी मिळतील. वर्षाच्या शेवटी, तुम्ही तुमच्या प्रवासावर, व्याजावर किंवा सुट्टीवर पैसे खर्च कराल. मात्र असे करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. वेळेचा सदुपयोग करताना योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

Rashi 2021: सूर्य-मंगळ-केतु एकत्र आल्याने त्रिग्रही योग; पुढचे १० दिवस ‘या’ दोन राशींच्या लोकांनी जरा सांभाळून

एकंदरीत, या वर्षी मकर राशीचे लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर अनेक यश संपादन करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमच्यावर कामाचा बोजा जास्त असण्याची शक्यता असली तरी भविष्यात तुम्हाला त्याचा फायदाही मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. या वर्षी लक्ष केंद्रित करून तुमची कार्य कौशल्ये सुधारण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात यशस्वी होऊ शकता.

Story img Loader