२०२२ नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नवं वर्ष कसं जाईल याबाबत सर्वांनाच्याच मनात प्रश्न आहे. त्याचबरोबर नव्या संकल्पांसह नव्या आशाही आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कोणता ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन झाल्यानंतर मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. ठराविक कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. ३० डिसेंबर २०२१ रोजी शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. २७ जानेवारी २०२२ पर्यंत या राशीत राहील. त्यानंतर मकर राशीत संक्रमण करेल. शुक्र एका राशीत सुमारे ३० दिवस राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या राशीतील बदल ४ राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. नवीन वर्ष या राशींसाठी उत्तम जाण्याची अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष: या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगलं जाईल. चांगल्या ग्रहमानामुळे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान मिळेल. मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे या काळात तुमचा पराक्रमात वृद्धी होईल. तसेच व्‍यापार करणार्‍यांसाठी देखील शुक्राचे संक्रमण उत्तम सिद्ध होईल. जेव्हा जेव्हा शुक्र संक्रमण कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या घरात प्रवेश करतो तेव्हा धनलाभ होतो. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात.

कन्या: या राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळविण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य वापराल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल राहील. नोकरीशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. कन्या रास शुक्र ग्रहाचा मित्र समजल्या जाणाऱ्या बुधाची राशी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना या वर्षी धनलाभ होऊ शकतो. यासोबतच नशिबाचीही पूर्ण साथ मिळू शकते.

Chanakya Niti: ‘हे’ गुण असलेली स्त्री तिच्या पतीसाठी मानली जाते भाग्यवान

सिंह: नवीन वर्षात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तुम्ही पैसे कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल. शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. व्यावसायिकांसाठी काळ उत्तम राहील. तुम्ही चांगले ग्राहक मिळवू शकाल आणि त्यांच्याशी चांगला व्यवहार करू शकाल. या वर्षात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

धनु: या राशीच्या लोकांना नवीन वर्षात चांगली कमाई करण्यात यश मिळेल. शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर बॉस खूश होतील. तसेच तुमचा पगार वाढू शकतो. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठीही हे वर्ष चांगले राहील. अनेक माध्यमातून पैसा येणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology venus will enter dhanu rashi on 30th december 2021 rmt