लक्झरी वाहन निर्माती कंपनी ऑडी इंडियाने आज अधिकृतपणे त्यांची ई-ट्रॉन जीटी आणि आरएस जीटी ही पहिली इलेक्ट्रिक सुपरकार भारतीय बाजारात लाँच केली आहे. तर कंपनीने ई-ट्रॉन ब्रँड अंतर्गत दोन महिन्यात चौथे आणि पाचवे इलेक्ट्रिक वाहन लॉंच केले आहेत. तसेच अतिशय आकर्षक डिझाइन आणि मजबूत शक्तीने सुसज्ज असलेल्या ऑडी ई-ट्रॉन जीटी या कारची किंमत १,७९,९०,००० रुपये इतकी तर आरएस ई – ट्रॉन जीटी ह्या कारची किंमत २,०४,९९,००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली असून (एक्स-शोरूम) ह्या दोन्ही कार भारतीय बाजारात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावरफुल सिरिज

ऑडी ई-ट्रॉन जीटी पूर्ण पणे नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती स्पोर्टीनेस, एक्सक्लूझिविटी आणि आराम(कंफर्ट) लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे.ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी इतर कोणत्याही आरएसपेक्षा वेगळी आहे. हे ऑडीचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल सीरीज उत्पादन आहे.

सुपरकारची शक्ती आणि वेग

ऑडी ई-ट्रॉन जीटी या सुपरकारमध्ये ३९० किलोवॅटची पॉवर आहे आणि ती ४.१ सेकंदात ताशी ०-१०० किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर ४७५ किलोवॅट पॉवर असलेल्या आरएस ई-ट्रॉन जीटी ही कार केवळ ३.३ सेकंदात हा वेग धारण करते. ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ८३.७/९३. ४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे.

ड्रायव्हिंग रेंज आणि चार्जिंग

ऑडीआरएस ई-ट्रॉन जीटी साठी ४०१-४८१ किमी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी ३८८-५०० किमीची रेंज प्रदान करते. तसेच या दोन्ही कारला २७० किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि ८०० व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग, सुमारे २२ मिनिटात ५% ते ८०% पर्यंत चार्ज होते.

परफॉर्मेंस

दोन्ही मॉडेल्समध्ये एडॉप्टिव एयर सस्पेंशन, तसेच ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आणि एमएमआय टच च्या डिस्प्लेसह स्टँडर्ड रुपात येत आहे. ऑडी आरएस ईट्रॉन जीटी वर मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स तर ऑडी ई-ट्रॉन जीटी वर एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आल्या आहेत . ऑडी लेजर लाइटसह मॅट्रिक्स एलईडी हेडलँप दोन्ही कारवर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या दोन्ही कार लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम आणि क्रूज कंट्रोलसह येते. तसेच यामध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस पॅकेज रुपात उपलब्ध करण्यात आले आहे. या कार्स पॅनोरमिक ग्लास रुफने सुसज्ज असून कार्बन रुपात अपग्रेड करण्यात आले आहे. या दोन्ही कार आयबिस व्हाइट, एस्कारी ब्लू, डेटोना ग्रे, फअलोरेट सिल्व्हर, केमोरा ग्रे, माइतोस ब्लॅक, सुजुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या नऊ रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत.