चीनी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉंच केली आहे. तसेच दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ९२,१३५ रुपये इतकी आहे. भारतात या स्कूटरचा एका व्हेरिएंटसह तीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. या स्कूटरचा स्टाईलिंग लूक जुन्या पद्धतीच्या इटालियन स्कूटरसारखा देण्यात आला आहे. ही स्कूटर एका चार्जवर १२० किलोमीटरची रेंज देते.

ऑरा इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

बेनलिंग ही कंपनी त्यांची चार उत्पादने एकत्र करून भारतात विक्री करतात. यापैकी ऑरा ही फ्लॅगशिप हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याचे उद्दीष्ट एथर ४५०X आणि बजाज चेतक इलेक्ट्रिकवर आहे. बेनलिंग ऑरा त्यांच्या मोटरमधून २५०० वॅट वीज निर्माण करते. त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक स्कूटर फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्ससह येते. तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर मॅट ब्लॅक, मॅट पर्पल आणि ग्लॉस ब्लू या तीन रंग पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये ऑरा यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्टार्ट किंवा स्टॉप बटण, स्मार्ट ब्रेकडाउन असिस्टन्स, पूर्णपणे डिजिटल कन्सोल, स्मार्ट बटण, अँटी-थेफ्ट अलार्म आणि पार्किंग असिस्ट मोड देण्यात आले आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
traffic cop warden booked for demanding bribe to remove car jammer
मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा
Shahrukh Khan death threat
Shahrukh Khan: चोरलेल्या मोबाइलवरून शाहरुख खानला धमकी; मालकाला अटक होताच जुने प्रकरण आले समोर

ऑरा इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आणि स्पीड

ऑरा 2.5kW BLDC मोटर आणि 72V/40Ah लिथियम-आयन बॅटरीसह येते. हे जलद चार्जिंगसह चार तासात पूर्णपणे चार्ज होण्याचा दावा करते, तर इको मोडमध्ये या स्कूटरची रेंज सुमारे १२० किमी आहे. लो, स्पोर्ट्स आणि टर्बो स्पीडसह आणखी तीन राईडिंग मोड या इलेक्ट्रिक स्कूटरला देण्यात आले आहेत. तसेच ई-स्कूटरची टॉप स्पीड सुमारे ६० किमी प्रतितास आहे आणि ब्रेकिंगला डिस्क-ड्रम कॉम्बोद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात.

भारतातील रस्ते आणि ग्राहकांनुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर अगदी आरामदायक बनवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर हरियाणामध्येच बनवण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला घरगुती सर्किट देण्यात आली आहेत, ज्यामुळे तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर कुठेही चार्ज करू शकता.

याआधीही भारतात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ओला ते बजाज, टीव्हीएस, हिरो सारख्या कंपन्यांनी आत्तापर्यंत त्यांचे सर्वोत्तम ब्रँड बाजारात आणले आहेत. त्याचबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे सरकार लोकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहित करत आहे.