बॉलीवूडमधल्या काही कॉमेडी व अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये आकाशात उडणाऱ्या कार तुम्ही पाहिल्या असतील. चित्रपटातली ही दृष्य पाहताना खरंच हे सर्व रिअल आयुष्यात घडलं तर? अशी कल्पना एकदातरी तुमच्या मनात डोकावलीच असेल. हो ना! सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अशीच हवेत उडणारी एक कार चर्चेचा विषय बनली आहे. ही रेसिंग कार असून ती रेसिंग ट्रॅकवर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावते आणि हवेत उडते देखील! आहे ना कमाल!

ऑस्ट्रेलियामधील अलाउडा एरोनॉटिक्स या कंपनीने जगातील पहिली हवेत उडणारी Alauda Airspeeder Mk3 ही रेसिंग कार तयार केली आहे. सध्या सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांची चर्चा सर्वत्र होताना दिसते. काही वर्षांपूर्वी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आपल्या गाडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ऑटोमॅटिक गाडी चालत असल्याचे दिसत होते.

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. आणि याला ऑटोमोबाईल क्षेत्रही अपवाद ठरलेले नाही. अलाउडा एरोनॉटिक्स कंपनीने या कारला फेब्रुवारीमध्ये जगासमोर आणले होते. नुकतीच दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये Alauda Mk3 फ्लाइंग कारची यशस्वी टेस्टिंग करण्यात आली. या वेळी काही सेकंदातच ही कार जमिनीपासून ५०० मीटर उंचीवर जाऊन स्थिरावली!

Story img Loader