आधार कार्ड हे भारतातील महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. बँकांपासून शाळा कॉलेजमध्ये आधार कार्डची आवश्यकता असते. आजच्या युगात हे केवळ प्रौढांसाठीच नाही तर पाच वर्षांखालील मुलांसाठी आणि नवजात मुलांसाठीही बनवले जात आहे. ओळख म्हणून त्याचा सर्वाधिक वापर केला जात आहे. हे पाहता मुलांच्या आधार कार्डच्या कागदपत्रांबाबत नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, दररोज ५० लाखांहून अधिक आधार प्रमाणीकरण केले जात आहे. तर पेमेंट सिस्टमद्वारे दरमहा ४० कोटींहून अधिक बँकिंग व्यवहार केले जात आहेत. आयएएमएआयद्वारे आयोजित इंडिया डिजिटल समिट २०२२ च्या १६ व्या बैठकीत बोलताना म्हणाले की, ऑफलाइन प्रमाणीकरण संख्या ५ कोटींहून अधिक आहे. ज्यांना ऑनलाइन सेवा वापरता येत नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. ऑफलाइन पडताळणी प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार ही सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे, ज्याचा उद्देश सर्व लोकांना ओळख प्रदान करणे आहे. आधार प्रमाणीकरण वैयक्तिक नागरिकांसाठी विनामूल्य आहे आणि नेहमीच विनामूल्य असेल. तथापि, यूआयडीएआयने अलीकडेच प्रमाणीकरणाची किंमत २० टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या पायाभूत सुविधांचा वापर लोकांना एकाधिक सेवा आणि फायद्यांद्वारे उत्तम जीवनशैली प्रदान करण्यासाठी करता येईल.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

बायकोचा वाढदिवस किंवा लग्नाची तारीख लक्षात राहात नाही?, व्हॉट्सअ‍ॅपच्या मॅसेज शेड्युल फिचरमुळे होईल मदत

आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता मुलांच्या आधार कार्डबाबत नियम बदलले आहेत. पालक आता मुलाचा जन्म झाला त्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र किंवा स्लिप देऊन त्यांच्या मुलाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. यूआयडीएआयनुसार, पाच वर्षांखालील मुले बाल आधारसाठी पात्र आहेत आणि आता पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक्स आवश्यक नाहीत. मूल पाच वर्षांचे झाल्यावर बायोमेट्रिक आवश्यक असेल. त्यानंतर, मुख्य आधार कार्डप्रमाणेच बालकांचे आधार कार्ड जारी केले जाईल.

बाल आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्वप्रथम अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • नोंदणीच्या वेळी वय पाच वर्षांपेक्षा कमी असावे.
  • नोंदणीसाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. याशिवाय पत्त्याचा पुरावा असावा.
  • पालकांचा आधार कार्ड क्रमांक हवा.
  • मुलाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे.
  • नियोजित भेटीच्या दिवशी, ओळखीचा पुरावा , पत्त्याचा पुरावा, नातेसंबंधाचा पुरावा, आणि जन्मतारीख (यासह संबंधित कागदपत्रांसह नोंदणी केंद्रावर भेट द्यावी लागेल.
  • तुमच्या सर्व कागदपत्रांची एका अधिकाऱ्याद्वारे छाननी केली जाईल.