Auto Expo 2020 च्या दुसऱ्या दिवशी Piaggio India ने दोन नव्या Scooty सादर केल्या आहेत. कंपनीने पेट्रोल इंजिनची Aprillia SXR 160 स्कुटीसोबत इलेक्ट्रिक स्कुटी Vespa Elettrica सादर केली आहे. एप्रिलिया SXR 160 च्या बुकिंगला ऑगस्ट 2020 मध्ये सुरूवात होईल.
Aprillia SXR 160 स्कुटी 160 सीसी आणि 125 सीसी अशा दोन इंजिनच्या पर्यायांसह उपलब्ध असेल. दोन्ही BS-6 कम्प्लायंट इंजिन आहेत. यामध्ये LED ट्विन हेडलाइट आणि टेल लाइट्स आहेत. Aprillia SXR 160 स्कुटीमध्ये युएसबी चार्जिंगचा पर्यायही आहे. यातील डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर मायलेज इंडिकेटरसोबत येते. या स्कुटीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आणि डिस्क ब्रेक दिले आहेत. तसेच 12 इंचाचे अॅलॉय व्हिल्स दिले असून रेड, ब्लू, व्हाइट आणि ब्लॅक अशा चार रंगांचे पर्याय ग्राहकांना असतील.
कंपनीने Vespa Elettrica ही दुसरी इलेक्ट्रिक स्कुटीही सादर केली आहे. Vespa Elettrica एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमीचा प्रवास करते असा कंपनीचा दावा आहे. या स्कुटीच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक आहेत. पावर मोडमध्ये गाडीचा कमाल स्पीड 70 किमी/तास असून ईको मोडमध्ये कमाल स्पीड 45 किमी/तास असेल. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी 3.5 तासांचा वेळ लागतो. या स्कुटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे, याद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करु शकतात. या फीचरमुळे म्युझिक आणि कॉलिंग यांसारख्या सुविधांचाही फायदा घेता येईल. यात पूर्णतः डिजिटल इंस्ट्रूमेंट दिले आहे, त्यावर नोटिफिकेशन दिसतात.