नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून भांडणे होत असतात, पण नंतर ते एक होतात. पती पत्नी एकमेकांना समजून घेतात आणि नात्याची विन घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही गोष्टी अशा आहेत ज्या पत्नी सहन करू शकत नाही. या गोष्टी करणे पतीने टाळले पाहिजे, अन्यथा नाते कमजोर होऊ शकते.
या गोष्टी टाळा
१) सर्वांसमोर अपमान करणे
दुसऱ्यासमोर आपल्या पत्नीचा अपमान करू नये. मतभेद किंवा घरगुती प्रकरणे ही घरातच सोडवलेली बरी. इतरांसमोर पत्नीचा अपमान केल्याने ती नाराज होऊ शकते. नंतर त्यांना समजवणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे, याबाबीची काळजी घ्यावी.
२) पत्नीच्या नातेवाइकांना वाइट बोलणे
जसे पतीच्या नातेवाईकांना काही बोललेले त्याला आवडत नाही, तसेच पत्नीलाही तिच्या नातेवाईकांबाबत काही वाइट बोललेले सहन होत नाही. तिलाही आपले नातेवाईक प्रिय असतात. त्यामुळे, त्यांचा आदर करावा. पण मतभेद असल्यास ते शांतीने सोडवावे.
३) परस्त्रीला पत्नीपेक्षा चांगले म्हणणे
पत्नीची कुणाशी तुलना करू नये. प्रत्येकाच्या अंगी कलागूण असतात. त्यामुळे, पत्नीची इतर व्यक्तींच्या पत्नीशी तुलना करू नये. किंवा कुणाशीही तुलना करून तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा ती नाराज होऊ शकते.
४) पत्नीला कुरूप म्हणणे
दिसण्यावरून पत्नीची मजाक करू नये किंवा तिची खिल्ली उडवू नये, अन्यथा ती नाराज होऊ शकते. संबंधांवर मोठा प्रभाव पडू शकतो. नंतर समजवणे कठीण होऊन बसू शकते.
५) पत्नीच्या कामाला महत्व न देणे
घरी काम करणारी पत्नी असो किंवा नोकरी करून घर सांभाळणारी, तिच्या कामाची दखल घेतली पाहिजे, कौतुक केले पाहिजे. जर पत्नीच्या कामाचे कौतुक न करता तिला सतत टोमणे मारणे किंवा तिचा अपमान केल्यास ती नाराज होऊ शकते.
6) पत्नीला तिची समस्या न विचारणे
घरी काम करताना किंवा बाहेर काम करताना स्त्रियांना अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. त्यांच्या या समस्यांची दखल घेतली पाहिजे. स्त्रिया सहज आपल्या समस्या सांगत नाही, मात्र प्रयत्न केल्यास त्या आपल्या मनाचे दरवाजे उघडे करू शकतात. त्यामुळे, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)