जे लोक एकाच ठिकाणी एक ते दोन तासापेक्षा अधिक वेळ बसून राहतात, त्यांना इतरांच्या तुलनेत लवकर मृत्यू येण्याचा धोका असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकाच जागी किती वेळ बसून घालवला तसेच दिवसातील कोणती वेळ बसण्याची होती यावर लवकरच मृत्यू येण्याचा धोका कळतो. जे व्यक्ती एकाच जागेवर कोणतीही हालचाल न करता एक किंवा दोन तास सतत बसून राहतात त्यांना लवकर मृत्यू येण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेत जास्त आहे. आळशी लोकांना याचा अधिक धोका असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

सतत आळशीपणा अंगात राहिल्याने आपण प्रत्येक दिवशी एकाच जागेवर जास्त तास बसून राहतो. हे प्रमाण सतत वाढत जाते. त्यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होतात, असे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरचे संशोधन सहकारी शास्त्रज्ञ केइथ डायझ यांनी म्हटले आहे.

संशोधकांनी यासाठी ४५ वर्षे वयाच्या ७ हजार ९८५ लोकांचा अभ्यास केला. या व्यक्तींनी किती वेळ बसून घालवला तसेच इतर बाबींचा यामध्ये अभ्यास केला. यामध्ये सरासरी ७७ टक्के लोकांमध्ये आळशीपणाची लक्षणे जाणवून आली. चार वर्षे यांची माहिती घेण्यात आली. चार वर्षांनंतर यातील जवळपास ३४० लोक मृत्यू झाले होते.

जे लोक दिवसातील १३ तासांपेक्षा अधिक वेळ आळसामध्ये अथवा ६० ते ९० मिनिट एकाच जागेवर कसलीही हालचाल न करता बसून राहतात त्यांना लवकर मृत्यू येण्याचे प्रमाण हे इतरांच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढत असल्याचे संशोधकांना आढळून आले. मात्र जे लोक ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ एका जागी बसतात त्यांना मृत्यू येण्याचा धोका कमी असतो, असेही संशोधकांनी सांगितले.

त्यामुळे जर आपले कार्यालयीन काम एकाच जागेवर बसून असेल तर प्रत्येक अध्र्या तासानंतर आपण विo्रांती घेत शरीराची हालचाल करावी. तुमच्या या एका बदलामुळे लवकर येणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होईल, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid sitting position for long life