Clean your laptop easy way: ऑफिसच्या कामापासून ते खासगी कामापर्यंत लॅपटॉप हा आज जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील लोक लॅपटॉप वापरतात. लॅपटॉपवर ऑनलाइन क्लासेस अटेंड करण्यापासून ते ऑफिसमधील काम करण्यापर्यंत, चित्रपट पाहणे आदी विविध गोष्टींसाठी लॅपटॉप वापरला जातो. त्याशिवाय घरोघरी टीव्हीचादेखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लॅपटॉप, टीव्हीच्या सततच्या वापरामुळे काही वेळा लॅपटॉप, टीव्ही खूप खराब होतात, जे वास्तविक स्वच्छ केले जाणे खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यात अनेकदा लॅपटॉप, टीव्ही स्वच्छ करताना काही चुका होतात, त्या लक्षात घेणे गरजेचे आहे.
लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
अनेकदा लोक लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीन साफ करताना काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचा डिव्हाइस खराब होतो. त्यानंतर त्यांचे मोठे नुकसान होते. या लेखात आम्ही तुम्हाला लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्याच्या टिप्स सांगणार आहोत.
लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीन साफ करताना लोक अनेक चुका करतात. त्यामुळे डिस्प्ले खराब होण्याचा धोका वाढतो. अनेक लोक पडदा स्वच्छ करण्यासाठी जाड कापड, टॉवेल किंवा पेपर नॅपकिन वापरतात. त्यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडू शकतात. तसेच काही लोक थेट स्क्रीनवर पाणी किंवा काही प्रकारचे क्लीनर वापरतात. पाणी किंवा क्लीनर थेट स्क्रीनवर फवारू नये. त्यामुळे स्क्रीनमध्ये आर्द्रता येऊ शकते, ज्यामुळे डिव्हाइस खराब होण्याचा धोका वाढू शकतो.
हेही वाचा: मजबूत, चमकदार केस हवेत? मग दररोज ‘ही’ दोन योगासने न चुकता करा
लॅपटॉप डिस्प्ले साफ कसा करावा?
लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारची स्क्रीन असो, ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे. स्क्रीनवर शिंपडण्यासाठी विशेष प्रकारचे लिक्विड क्लीनर वापरावे. कोणतेही द्रव थेट स्क्रीनवर फवारू नये. जर तुम्हाला लिक्विड वापरायचे असेल, तर त्याआधी ते लिक्विड मायक्रोफायबर कपड्यावर शिंपडूनच वापरा.