Heart Attack: गेल्या वर्षभरापासून देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहेत. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत ​​नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. नुकतेच टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. व्यायाम करताना जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?

Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Chest Pain & Heart Attack
Chest Pain & Heart Attack : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का? तज्ज्ञ काय सांगतात…
Vidyut Jammwal
Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Heart disease risk , non vegetarian , health care,
हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…
foamy urine kidney problem
लघवीमधून प्रचंड फेस येतोय? हे कोणत्या आजाराचे लक्षण तर नाही ना? वाचा डॉक्टर काय सांगतात

हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होणे व त्यामुळे हृदयाचा स्नायू निकामी होणे याला हृदयविकाराचा झटका असे म्हणतात. 

व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका का येतो?

व्यायाम सर्वांसाठी जरूरीचा आहे; पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात. व्यायाम करणे चांगले असले, तरी अति व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे. अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला ‘सडन कार्डिअॅक अरेस्ट’ येण्याची शक्यता असते. त्याला अचानक आलेला हृदयविकाराचा झटका असेही म्हटले जाते. अति व्यायामामुळे हृदयावर ताण येतो. त्यामुळे हृदयाची गती थांबते त्याला हृदयाची अनियमित गती (अरिदमिया) असे म्हणतात. त्यामुळे कोणत्याही वयात व्यायाम करताना काळजी घ्यावी.

आणखी वाचा : Lemongrass: लेमनग्रास आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

हृदयविकाराचा धोका कोणाला जास्त आहे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. हा धोका विशेषतः मधुमेह किंवा रक्तदाबाचा आजार असलेल्या लोकांमध्ये जास्त असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जीममध्ये तीव्र व्यायाम करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार नाही याची खात्री करून घ्या. यासाठी चाळीशीनंतर हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या मते, ज्यांना हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या आहे त्यांच्यासाठी धावणे घातक ठरू शकते. खरं तर, हृदयाच्या धमन्यांमध्ये एरिथेमॅटस प्लेकचा जास्त व्यायाम केल्याने फुटण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही तुमच्या वर्कआउटच्या क्षमतेबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्यायाम कधीही वाढवू नये. कारण त्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होतात. त्यामुळे इतरांचा सल्ला न ऐकता तुमची क्षमता ओळखून व्यायाम करा.


हृदयविकाराचा धोका कसे टाळाल?

  • जास्त व्यायाम करू नका, तंदुरुस्त राहा त्यामुळे आठवड्यातून काही दिवस व्यायाम करायला हरकत नाही. बैठी जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय असणे आवश्यक आहे. जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर दर १ तासाने उठून थोडे चालत जा.
  • हृदय निरोगी ठेवायचे असेल तर कमी झोपण्याची आणि रात्री उशिरा झोपण्याची सवय संपवा. रात्री किमान ७-८ तासांची झोप घ्या.
  • तणाव हृदयासाठी तसेच मेंदूसाठी निरुपयोगी आहे, त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव टाळण्यासाठी योगा आणि ध्यानाची मदत घ्या
  • जिम किंवा वर्कआउटमधून शरीर टोन्ड किंवा स्नायु बनवण्यासाठी स्टिरॉइड्स अजिबात वापरू नका. स्टिरॉइड्स आरोग्यासाठी धोकादायक असतात.
  • तसेच, सप्लिमेंट्स किंवा गैर-आवश्यक हार्मोनल औषधे घेणे देखील हृदयासाठी चांगले नाही. कमी चरबी आणि कमी साखर असलेला चांगला आरोग्यदायी आहार घ्या. तसेच फायबरचे प्रमाण जास्त असलेले अन्न खा.

Story img Loader