Periods Pain: मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. मासिक पाळीचे पहिले तीन दिवस प्रत्येक स्त्रीसाठी त्रासदायक असतात. मासिक पाळी दरम्यान, बहुतेक महिलांना ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पाय आणि मांड्या दुखणे जाणवते. मासिक पाळी दरम्यान, आपले शरीर हार्मोन तयार करते. ज्यामुळे गर्भाशय आकुंचन होतो आणि गर्भाशयाच्या अस्तरांना बाहेर पडण्यास मदत होते.
हे आकुंचन महिलांमध्ये मासिक पाळीत कॅम्प्सच्या रुपात जाणवते. या संप्रेरकांमुळे पाय दुखणे, पाठदुखी अशी समस्या निर्माण होते. या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ठराविक पदार्थांचे सेवन केल्याने मासिक पाळीत वेदना वाढू शकतात. होमिओपॅथिक फिजिशियन सुप्रिया काबरा यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला ३ ते ७ दिवस मासिक पाळी येत असेल, रक्तस्त्राव ना कमी ना जास्त असेल. पीरियडदरम्यान होणारा त्रास तुम्ही सहन करू शकता तेवढाच असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा सामान्य आहार घेऊ शकता.
परंतु या काळात जर तुमचे मासिक चक्र बिघडत असेल, वेदना जास्त असेल आणि रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होत असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या दरम्यान, आहारातील काही पदार्थ टाळून तुम्ही तुमची समस्या दूर करू शकता. या काळात काही पदार्थांचे सेवन केल्याने पीरियड दुखण्याची समस्या वाढू शकते. जाणून घेऊया पीरियड्स दरम्यान कोणते पदार्थ टाळावेत.
थंड गोष्टी टाळा
मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता वाढत असेल तर तुम्ही थंड गोष्टी टाळा. थंड पदार्थांमध्ये थंड पेय, आईस्क्रीम, दही, ताक यांचे सेवन टाळा. या दरम्यान, लिंबूवर्गीय फळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टींचे सेवन टाळा, तुम्हाला वेदनापासून आराम मिळेल.
मसालेदार पदार्थ टाळा
मासिकपाळी दरम्यान पचनक्रिया बिघडू लागते आणि पोट बिघडण्याची समस्या अधिक होते. या दरम्यान भरपूर अन्न, मांस, तेलकट अन्न, दूध आणि चहा टाळा. या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू लागते आणि पोटात समस्या निर्माण होऊ शकतात.
( हे ही वाचा: हस्तमैथुन केल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)
कॉफी, चहा आणि दूध यांचे सेवन कमी करा
या काळात चहा, कॉफी आणि दुधाचे सेवन कमी करा. दूध, चहा आणि कॉफीमुळे अॅसिडिटीची समस्या वाढू शकते, त्यामुळे त्यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कॉफी आणि चहामध्ये असलेले कॅफिन वेदना वाढवू शकतात. मासिक पाळी दरम्यान दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा.