लहानपणापासूनचं आई आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय लावली जाते. या भाज्यांमध्ये शरीरास आवश्यक पोषक तत्व आणि शक्ती असते. पालेभाज्यांमुळे मेंदू, ह्रदय, किडनी, यकृत आणि रक्त सर्वकाही निरोगी राहते. यात शरीरास आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे आढळतात, त्यामुळे रोजच्या आहारात एकतरी पालेभाजीचा समावेश असा सल्ला डॉक्टर देतात.

पालक आणि मेथी या दोन निरोगी पालेभाज्या आहेत. ज्यातून शरीरास व्हिटॅमिन सी, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, लोह, तांबे, जस्त असे घटक मिळतात. पण पावसाळ्यात पालक आणि मेथी खाण्याची चूक कधीही करू नका. कारण या दिवसात पालक आणि मेथीमध्ये लहान धोकादायक कीटक असू शकतात. जे खाल्ल्यानंतर मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तुम्ही आजारी पडू शकता.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. चैताली राठोड यांनी पावसाळ्यात कोणत्या पालेभाज्या खाव्यात किंवा खाऊ नयेत याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

Monsoon rain & stomach infection: पावसाळ्यात जुलाब, उलट्यासारखी लक्षणं जाणवतायत? वाचा मग यावर डॉक्टर काय सांगतात…

पावसाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. चैताली राठोड यांच्या मते, पावसाळ्यात पालक आणि मेथी यांसारख्या नेहमी मिळणाऱ्या पालेभाज्यांपासून विश्रांती घेतली पाहिजे म्हणजे खाणे काही दिवस थांबवले पाहिजे. कारण पावसाळ्यात या भाज्यांमधील आर्द्रता वाढते आणि बॅक्टेरियाचे प्रमाणही वाढते.

मेथी, पालकऐवजी खा ‘या’ पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आहारातून त्या पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. पण डॉक्टरांच्या मते, पालक, मेथीऐवजी तुम्ही राजगिरा, मोरिंगाची पाने आणि अंबाडीची पाने खाऊ शकता. जी पावसाळ्यात अधिक ताजी आणि सुरक्षित मानली जातात.

राजगिरा, शेवगा आणि अंबाडीच्या भाजांचे सेवन करा

१) राजगिऱ्याच्या पानांची भाजी

राजगिऱ्याच्या पानांमधून तुम्हाला कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, फॅटी अॅसिड्स मिळते.

२) शेवग्याची पानं

शेवग्याच्या पानांमधून आपल्या शरीरास प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, लोह, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम मिळते.

३) अंबाडीची पानं

अंबाडीची पानांमध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, बीटा कॅरोटीन, सायट्रिक, टार्टरिक ऍसिड आणि इतर पोषक तत्वे असतात. या भाज्या आपल्याला पावसाळ्यात खायला मिळतात.

पालेभाजी खाताना घ्या ‘ही’ काळजी

पावसाळ्यात मेथी, पालक किंवा इतर कोणतीही हिरव्या पालेभाज्या खायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्व प्रथम बाजारातून आणलेल्या पालेभाजीत कीट आहे का ते नीट तपासा. यानंतर त्या पूर्णपणे साफ करुन पाण्याने स्वच्छ करा आणि उच्च तापमानावर शिजवा, ज्यामुळे कोणताही आजारांचा धोका वाढणार नाही.

Story img Loader