Tips to Reduce Migrain Pain : काही जण मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त असतात. मायग्रेनमध्ये अस्वस्थ वाटणे, उल्टी होणे अशी लक्षणे दिसतात. मायग्रेनचा असह्य त्रास होत असताना त्या व्यक्तीचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. औषध आणि आहारातील काही पथ्य पाळून मायग्रेनची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते. पण काही जणांना कोणत्याही औषधांचा फायदा होत नाही. अशावेळी आयुर्वेदातील उपाय करून पाहण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. मायग्रेन पेनवर आयुर्वेदात काय उपचार सांगण्यात आले आहेत जाणून घेऊया.

मायग्रेन पेनवर आयुर्वेदात सांगण्यात आलेले उपचार

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

भिजवलेले मनुके

आयुर्वेदानुसार भिजवलेले मनुके मायग्रेन पेन घालवण्यासाठी मदत करतात. तुम्ही रात्री १० ते १५ मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे भिजवलेले मनुके खा. यासोबत हर्बल चहादेखील पिऊ शकता. अशाप्रकारे भिजवलेले मनुके १२ आठवडे तुम्ही सलग खाल्ले, तर यामुळे वाढलेल्या वातासह शरीरातीत अतिरिक्त पित्त कमी होते. तसेच एका बाजूची डोकेदुखी, मळमळ, ऍसिडिटी ही मायग्रेनची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

Health Tips : अशक्तपणा आणि थकवा जाणवतोय? हे पाच पदार्थ खा, नक्की मिळेल फायदा

जिरे आणि वेलचीचा चहा

जेव्हा तुम्हाला मायग्रेनचा असह्य त्रास होईल तेव्हा तुम्ही जिरे आणि वेलचीचा चहा पिऊ शकता. हा चहा बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या, त्यात एक चमचा जिरे आणि एक वेलची टाकून साधारण ३ मिनिटांपर्यंत उकळा. त्यानंतर हा चहा गाळून घेऊन पिऊ शकता. यामुळे तणाव आणि अस्वस्थ वाटणे कमी होईल. अगदी दुपारी जेवणानंतर किंवा रात्री झोपण्याआधी जर तुम्हाला तीव्र लक्षणे जाणवत असतील, तर तेव्हा तुम्ही हा चहा पिऊ शकता.

गाईचे तूप

शरीरातील अतिरिक्त पित्ताचा समतोल राखण्यासाठी गाईचे तूप उत्तम मानले जाते. जेवताना चपाती, भात किंवा भाजीमध्ये तूप मिसळून खाऊ शकता. तसेच रात्री झोपताना दुधामध्ये तूप टाकून पिऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही आहारामध्ये तूपाचा समावेश करू शकता. यामुळे पित्ताचा समतोल राखला जाईल आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)