Kadha for cold and cough: थंडीमुळे देशातल्या अनेक भागांतील हवामानात बदल झाला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या हवामानामुळे लोकांना सर्दी, खोकला व घसादुखीचा त्रास होऊ लागला आहे. खरं तर, या ऋतूमध्ये अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी होते आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
वाढत्या थंडीत सर्दी, खोकला व घसा खवखवण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त असाल, तर आज आम्ही तुम्हाला ते दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळशीच्या पानांचा काढा बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १० तुळशीची पाने
  • २ चमचे मध
  • ४ लवंगा
  • १ तुकडा दालचिनी

तुळशीच्या पानांचा काढा कसा बनवायचा?

तुळशीच्या पानांचा काढा बनविण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. आता त्यात तुळशीची पाने टाका. काही वेळाने त्यात लवंगा आणि दालचिनीचे तुकडेही टाका. आता ते पाणी १०-१२ मिनिटे व्यवस्थित उकळवा. त्यानंतर ते गाळणीतून व्यवस्थित गाळून घ्या. हा काढा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.

हेही वाचा: काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स

तुळशीच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे

तुळशीच्या पानांचा काढा पिण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हा काढा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते. हा आयुर्वेदिक काढा प्यायल्याने सर्दी, खोकला व घसा खवखवणे यांसारखे त्रास सहजपणे बरे होतात. तसेच हा काढा शरीराचे डिटॉक्सिफाईंग करून, तणाव कमी करण्यास मदत करतो. तुळशीचा काढा रात्री प्यायल्याने चांगली झोप लागते.