आपल्या लहानपणी जेव्हा आजी किंवा आई आपल्या केसांना तेल लावून पोनीटेल बांधायच्या तेव्हा आपल्यापैकी कुणालाही ते आवडत नव्हतं. बहुतेक मुलींना केस मोकळे ठेवायला खूप आवडतं. यामुळे त्यांचे केस अधिक तुटतात आणि निर्जीव होतात. पण तुम्हाला माहित आहे का, की केस बांधून ठेवल्याने केस कमकुवत होत नाहीतच पण मजबूत सुद्धा होतात. तसंच केसांची मुळे मजबूत होतात. केस बांधून ठेवण्याचे आणखी इतर फायदे जाणून घेऊया.
केस गळती कमी होते- केसांची वेणी बांधून ठेवल्याने केस गळती कमी होते. त्यामुळे दाट केस करण्यास मदत होते. केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने पोनीटेल बनवा. यामुळे केस बांधलेले राहतील आणि तुटणार सुद्धा नाहीत.
वेणी बनवून ठेवल्याने केस लांब होतात – सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. केसांना तेल लावून वेणी बांधून ठेवली की केसांची वाढ होत असते. तसंच वेणी बांधून ठेवली की केसांवर कमी ताण पडतो आणि केस लांब होण्यास मदत होते.
दुभंगलेल्या केसांपासून सुटका- केसांना तेल लावून, वेणी बनवल्याने केस अबाधित राहतात. यामुळे फाटे फुटलेल्या केसांची समस्या दूर होते. वेणी बांधून ठेवल्याने केसांना मजबूत तर ठेवतंच पण धूळ, प्रदूषण आणि मातीपासून सुद्धा संरक्षण करण्यास मदत करते.