अयोग्य आहार आणि असंतुलित जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. वजन वाढणे हा त्याचा सर्वात मोठा परिणाम आहे. त्याचबरोबर, यामुळे त्वचेवर फोडे आणि पिंपल्स देखील येतात. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात फोडे पिंपल्स येण्याची समस्या अधिक वाढते. त्वचा तज्ज्ञांच्या मते, त्वचेवर फोड आणि पिंपल्स हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतात. त्यामुळे, स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. फोडे पिंपल्ससाठी बाबा रामदेव यांनी काही योगासने सूचवली आहेत, ती आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपालभाती – कपालभाती केल्याने फोडे, पिंपल्सपासून सुटका मिळण्यासाठी मदत होते, असे बाबा रामदेव सांगतात. रोज कपालभाती केल्याने कार्बन डायऑक्साइड शरीरातून बाहेर पडतो. असे केल्याने रक्त देखील शुद्ध होते, ज्यामुळे त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. कपालभाती केल्याने पचनक्रिया देखील सुधारते आणि ब्लड सर्क्युलेशन देखील वाढते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

(Breast Cancer: त्वचेवर असलेल्या तीळांमुळे महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो का? जाणून घ्या यामागचे सत्य)

उत्तानासन – अनेकदा तणावामुळे देखील पिंपल्स होतात. स्वामी रामदेवनुसार, उत्तानासन केल्याने शरीर ताणले जाते आणि मुत्रपिंड आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते. रोज हे योगासन केल्याने फोडांची समस्याही दूर होऊ शकते, तसेच या योगासनामुळे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे त्वचारोग दूर होण्यास मदत होते.

शिर्षासन – योग गुरू स्वामी रामदेवबाबानुसार, शिर्षासन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह बरोबर राहतो. याशिवाय दररोज सुमारे 10 मिनिटे हा योग केल्याने त्वचेच्या फोडांच्या समस्येसोबतच सुरकुत्याची समस्याही दूर होते. हे योगासन चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासही मदत करते.

हे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात :हे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात :

  • शरीरावरील फोडे ठीक करण्यासाठी नारळाचे पाणी देखील फायद्याचे आहे. नारळाच्या पाण्यात अँटिबॅक्टेरियल गुण असतात, जे फोडांना लवकर सुकवतात.
  • कडुलिंबाच्या पानांमध्ये बुरशीविरोधी गुण असतात. कडुलिंबाच्या पाणांना बारीक करून ते त्वचेवर लावल्यास आराम मिळू शकतो.
  • हळद आणि दुधाचे मिश्रण करून पेस्ट बनवा. याने देखील फोडे आणि पिंपल्स लवकर सुकतात.
  • तुळशीच्या पानांची पेस्टही जखमा सुकवण्यात मदत करतात.

(Vitamin D च्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स; जाणून घ्या यावर योग्य उपचार)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev yoga asanas to treat boils and pimples on the body ssb